Last Updated on 23 Oct 2023 8:13 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सातारा तहसिलदार राजेश जाधव यांचे नागरीकांना आवाहन
सातारा । दसरा – दिवाळी सन २०२३ च्या निमित्ताने जमीन विक्रीबाबत आकर्षक जाहीराती व खोट्या प्रलोभनाला नागरीकांनी बळी पडू नये,असे आवाहन सातारा तहसिलदार राजेश जाधव यांनी केले आहे.
काही व्यक्ती/संस्था दसरा – दिवाळी सन २०२३ च्या निमीत्ताने कास पठारावरील जागा जमीन विक्रीबाबत आकर्षक जाहीराती देत आहे.याबाबत जमीन,प्लॉट घेणेपूर्वी सदर जमीन बिनशेती करणेसाठी सक्षम प्राधिकारी यांची परवानगी तसेच त्यानुषंगाने करणेच्या अटी व शर्तींची पूर्तता करण्यात आली आहे अगर कसे, याची शहानिशा करावी,अन्यथा भविष्यात निर्माण होणा-या कायदेशीर बाबींना आपण स्वतः जबाबदार रहाल,असे तहसीलदार सातारा यांचेकडून सर्व नागरीकांना आवाहन करण्यात आले आहे.









































































