सांगली । वाळवा तालुकातील कारंदवाडी येथील राष्ट्रवादी पक्षाचे माजी ग्रामपंचायत सदस्य सचिन युवराज लोंढे,विशाल कृष्णा कामिरे यांनी आपल्या कार्यकर्त्यासह भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले- पाटील (दादा) यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला.कारंदवाडी ग्रामपंचायत निवडणुकी च्या तोंडावर राष्ट्रवादी पक्षातील कार्यकर्त्याचा भाजपा मध्ये प्रवेश हा राष्ट्रवादीला मोठा धक्का म्हणावा लागेल.
सचिन लोंढे हे गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षातुन निवडुन आहे होते तर विशाल कामिरे यांच्याकडे राष्ट्रवादी पक्षाच्या संघटनात्मक कामाची जबाबदारी होती.लोंढे व कामिरे यांच्या विचाराच्या असंख्य कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी ला राम राम ठोकत भाजपा पक्षात प्रवेश केला.होणार्या ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामपंचायतीवर भाजपा विचाराचा झेंडा फडविण्याचा निर्धार यावेळी सर्वानी केला.
यावेळी बोलताना लोंढे व कामिरे म्हणाले संपुर्ण देशभर व जगभरात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नेतृत्वाला मान्यता मिळत आहे.आपला देश सर्वस्तरावर यशस्वी ठरत आहे,गेल्या नऊ वर्षातील काम हे दिपस्तंभासारखे उभा केले आहे.वाळवा तालुक्यातील राजकारण हे घराणेशाही व नातेवाईक यांच्या भोवती चालत असुन सर्वसामान्यांना न्याय व सन्मान राष्ट्रवादी पक्षात मिळत नाही,कर्तबगारीला महत्व नाही,भाजपा पक्षात मान, सन्मानाबरोबर सर्वसामान्यांच्या कामाचा निपटारा होत आहे,गेल्या पाच वर्षात आमच्या गावासाठी केंद्र व राज्यशासनाने कोटयावधी रुपयाचा निधी विकास कामासाठी दिला आहे.यामुळे आम्हि भाजपा पक्षात प्रवेश करीत असल्याचे सांगितले.
यावेळी भाजपाचे वाळवा तालुका अध्यक्ष निवास पाटील,माजी अध्यक्ष धैर्यशील मोरे,संघटन सरचिटणीस संदिप सावंत,वाळवा तालुका भाजपा ओबीसी सेल चे अध्यक्ष मधुकर हुबाले यांनी नुतन कार्यकर्त्याचे स्वागत केले.भविष्यात कार्यकर्त्यांना सार्वगिण विकासकामासाठी सर्वतपोरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
यावेळी वाळवा तालुका भाजपाचे उपाध्यक्ष अनिल सरदेशमुख,युवा नेते सचिन सावंत,सदाशिव यादव,दिगंबर ठाणेकर,संदीप कोकरे,अनिल सावंत,शंकर हाके,दिनकर सरदेशमुख,अजित वाडकर,तात्यासो उर्फ बंडू कोळेकर,आनंदा मानवर,नितीन रसाळ,रूबाब मुलाणी,इमरान मुलाणी,दादा कांबळे,जगन्नाथ जाधव आदिसह अन्य मान्यवर उपस्थित होते.