![]()
अलार्म दीपावलीच्या आगमनाचा…! निमित्त साबणाच्या जाहिरातीचे पण जिव्हाळा अलार्म काकांचा!
हे सर्वांना जाहिरातीच्या माध्यमातून सांगणारे विलेपार्ले येथील रहिवासी आबा उर्फ विद्याधर करमरकर यांचे तीन वर्षापूर्वी वयाच्या 96 व्या वर्षी निधन झाले.पण अलार्म काका आजही सर्वांच्या हृदयात कायम आहेत.
‘उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली’
श्रावणातील व्रत-वैकल्ये, गणपती, दसरा संपल्यावर आणि व्यवसाय,नोकरी करणारे,आर्थिक चणचण व मरगळलेल्या परिस्थितीत घरीआल्यावर त्याकाळी प्रसारमाध्यमांवर मोती साबणाची जाहिरात यायची आणि दीपावलीच्या आगमनाने मन सुखावले जायचे.
एक बाप आपल्या मुलास म्हणायचा अजून सगळे झोपलेले का ?….अलार्म काका सोसायटी सोडून गेले का ?…
त्यावर त्यांचा मुलगा प्रश्न करायचा….हे अलार्म काका कोण ? त्यावेळी त्या मुलाचे बाबा म्हणायचे,आमच्या लहानपणी बाळा बंद दारावर मोती साबणाने वाजवत अलार्म काका सोसायटीच्या सर्वांना म्हणायचे,’उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली’…
हेही वाचा – हायवेचा सुपरस्टार : लक्षवेधी लखन…!
पण, सध्या अलार्म काकाआपल्यात नाहीत…मग वडील आणि तो लहान मुलगा मनाशी ठरवतात?
आणि…! पुन्हा…’उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली’
तो लहान मुलगा अलार्म काकांच्या स्टाईलने सोसायटीच्या लोकांना उठवत पुन्हा नव्याने अलार्म काकांची परंपरा अशीच पुढे चालू ठेवण्याची हमी अलार्म काकांना देतो आणि अलार्म काका समाधानी होतात.
तेच अलार्म काका म्हणजे आबा उर्फ विद्याधर करमरकर यांचे वयाच्या 96 व्या वर्षी निधन झाले, दिवाळीचा हा अलार्म मागील तीन वर्षांपुर्वी ते नव्या पिढीकडे देवून गेले.
अशा एका जाहिरातीने चैतन्य निर्माण व्हायचे,बाजारपेठ खुलून जाण्यासाठीचा तो एक अलार्मच होता…?
कै.आबा उर्फ विद्याधर करमरकर याच्या पवित्र्य स्मृतीस विनम्र अभिवादन!
तसेच या निमित्ताने सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
![]()










































































