Last Updated on 10 Oct 2023 9:21 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । गेल्या ४० वर्षापासून प्रलंबित असलेला वारणा प्रकल्पग्रस्तांचा निर्वाह भत्त्याचा प्रश्न माजी मंत्री आ.जयंत पाटील यांच्या अथक प्रयत्नांनी मार्गी लागला आहे.याचा साधारण ४०० उर्वरित खातेदार कुटुंबांना लाभ मिळणार असल्याने वारणा प्रकल्पग्रस्तांच्यामधून समाधान आणि आनंद व्यक्त केला जात आहे.राज्याचे वन खात्याचे प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डी यांच्या मुंबई येथील मंत्रालयातील कक्षात आ.जयंत पाटील,तसेच संबंधित अधिकारी व प्रकल्पग्रस्त कार्यकर्त्यांची बैठक झाली.या बैठकीत प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावला आहे.
मुंबई येथील बैठकीस वन खात्याचे प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डी,उपप्रधान सचिव व्हीक्लिमेंट बेन,उपजिल्हाधिकारी रघुनाथ पोटे,कार्यकारी अभियंता डी.डी. शिंदे, उपवन संरक्षक अजित साजने,तहसिलदार रंजना बिचकर,प्रकल्पग्रस्तांचे नेते किसन मलप बागणी, धावजी अनुसे नेर्ले,शंकर सावंत कवठेपिराण,नामदेव नांगरे फाळकेवाडी,दीपक वाघमारे चिकुर्डे,मुबारक कावनकर,तसेच संबंधित अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रकल्पग्रस्तांना वाटप केलेल्या जमिनी वर्ग २ मधून वर्ग १ करण्यासाठी मंत्रालयात २-३ बैठका झाल्या आहेत. मात्र यातून तोडगा निघाला नाही. त्यामुळे उपविभागीय अधिकारी वाळवा आणि मिरज यांनी १४ ऑक्टोबर २०२१ च्या आदेशाचा आधार घेवून १२ टक्के व्याजासह काही प्रकल्पग्रस्तांना ५५ गुंठे जमिनीस ४१ लाख रुपये एवढी कब्जे हक्काची नोटीस काढली. मात्र ४ जून २०१९ च्या आदेशात ज्या प्रकल्पग्रस्तांची मूळ शेतजमीन वर्ग १ असेल, तर वाटप केलेली जमीन विना मूल्य वर्ग १ करण्याची तरतूद आहे. त्याप्रमाणे करून घ्यावे,असे म्हणणे प्रकल्पग्रस्तांनी मांडले. हा प्रश्न येत्या महिन्यात सोडवू,असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
यापूर्वी साधारण २२० खातेदारांना घर बांधणीसाठी रुपये १० हजार ऍडव्हान्स दिलेला आहे. या खातेदारांना नव्या शासन आदेशाप्रमाणे १ लाख ६१ हजार ४०० देण्या चे मान्य केलेले आहे. या खातेदारांना उर्वरित घर बांधणी अनुदान रक्कम देण्यासाठी उप वन संरक्षक सांगली यांनी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना व्हाव्यात,अशी प्रकल्प ग्रस्तांची मागणी होती. त्याप्रमाणे जिल्हा स्तरावरून माहिती घेऊन हा विषय सोडवू, अशी ग्वाही या बैठकीत देण्यात आली.
वारणा प्रकल्पग्रस्तांचे कार्यकर्ते बाबुराव पाटील कुरळप,तानाजी पाटील बोरगाव, नामदेव पाटील बागणी,पांडुरंग पाटील येलूर,धोंडीबा सावंत कवठेपिरान,तुकाराम लाखन नवेखेड,प्रकाश नांगरे दुधगाव,विष्णू पवार आष्टा-पोखर्णी,लक्ष्मण सावंत आष्टा- लोटीव,दिलीप पाटील तुंग,लखन पवार कसबे डिग्रज,आकाश पाटील चिकुर्डे, ईश्वर पाटील मांगले,अशोक चिबडे शिगाव यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांचे अथक प्रयत्न आणि आम्हा कार्यकर्त्यांच्या परिश्रमास फळ आल्याचे मोठे समाधान असल्याची प्रतिक्रिया किसन मलप आणि धावजी अनुसे यांनी व्यक्त केली.












































































