Last Updated on 04 Oct 2023 6:25 PM by Sanjay Patil/Adhorekhit
शहर युवक राष्ट्रवादी व खेळाडूंच्या वतीने निवेदन
सांगली । इस्लामपूर शहरातील पोलीस परेड ग्राउंड खेळाडूंच्या व्यायाम व सरावासाठी खुले करावे,असे निवेदन शहर युवक राष्ट्रवादी व खेळाडूंच्या वतीने देण्यात आले. युवक राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सचिन कोळी यांनी इस्लामपूरचे पोलीस निरिक्षक संजय हारूगडे यांच्याकडे हे निवेदन दिले. यावेळी अनेक खेळाडू व कार्यकर्ते उपस्थित होते.
इस्लामपूर शहरास विविध खेळांची मोठी परंपरा आहे. शहरात अनेक राज्य व राष्ट्रीय स्पर्धा गाजविलेले गुणी खेळाडू आहेत. तसेच शहरातील अनेक तरुण स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहेत. या सर्व खेळाडूंना पोलीस परेड ग्राऊंड खुले करावे,अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
याप्रसंगी युवक राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष स्वरूप मोरे,मोहन जाधव, अभिजित भगवान पाटील,अभिजित रासकर, श्रीकांत अस्वले व खेळाडू उपस्थित होते.










































































