गुरुवार दि. 28 सप्टेंबर 2023
अनंत चतुर्दशी या आध्यात्मिक व्रताच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा।
भाद्रपद शुद्ध चतुर्दशी ही अनंत चतुर्दशी नावाने ओळखली जाते.
ब्रह्मपुराणात ‘अनंन्तं पूजयेद्यस्तु प्राप्त : काले समाहित : I अनंन्तां लभते सिद्धिं चक्रपाणेः प्रसादतः॥
असा उल्लेख आहे.ज्यास अंत नाही तो अनंत.म्हणजेच प्रत्यक्ष परमात्मा परमेश्वर.असा परमेश्वर चराचरात पाहणे हेच खरे अनंतदर्शन होय.असे अनंत दर्शन घडल्यास इह जन्मीचे व पूर्वजन्मीं पाप संस्कार क्षीण होतात आणि अहंकार गळून पडतो.एखादा माणूस ज्यावेळी अहंकार रहित होतो,तेव्हा परमेश्वर त्याच्यावर संतुष्ट होऊन त्याला वैभव व ऐश्वर्य बहाल करतो हीच संकल्पना.
अनंत व्रत्तकथेत आहे.
पारंपारिक अनंत कथेनुसार कौंडण्य नामक मुनी अनंताचा दोरक अहंकाराने अग्नीत फेकून देतात व त्यामुळे त्यांना महा दारिद्र्य येते ते वणवणी भटकतात.त्या वेळी गाय,बैल इ.पशूंचे अम्रवृक्षा सारख्या वनस्पतींचे व तळ्यासारख्या नैसर्गिक गोष्टीचे दर्शन होते,पण त्याच्यातील परमेश्वर त्यांना ओळखून येत नाही.पुढे त्यांची गलिताहंकृती होवून स्वतः अनंत देव वृद्ध ब्राह्मणाच्या रूपाने त्यांना दर्शन देऊन गत वैभव प्राप्त करून देतात.
या व्रताचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करता,अनंत पूजेत प्रामुख्याने यमुना शेष आणि अनंताचा दोरक यांची पूजा असते.यमुना हे मनावरील काम क्रोधांचा ताबा ठेवण्याचे प्रतीक आहे.शेष हे महासामर्थ्यशाली पण अहंकार रहित तत्त्वाचे प्रतीक आहे.तर अनंताचा दोरक हे संसारातील कालचक्राचे प्रतीक आहे.संसाराचे कालचक्र 14 आऱ्यांचे असून त्याला दोन कणे असतात.दोन कण्यांपैकी एक कणा आयुष्यातील अत्यंत निम्न स्तर दाखवतो तर एक कणा अतिउच्च उत्तुंग अवस्था सूचित करतो.संसाराचे कालचक्र तिथींच्या संख्येवरून कळून येते एकूण 14 तिथी असून त्यात चढत जातात तेव्हा त्यांची परिणीती उत्कट बिंदूत म्हणजे पौर्णिमेत होते व उतरत जातात तेव्हा त्याची परिणीती शून्य बिंदूत म्हणजे अमावस्येत होते .
कालचक्राचे हे 14 भाग सुचित करण्यासाठी अनंताचा दोरख ही 14 सूत्रांचा,याचा अर्थ धाग्यांचा असतो.संसार हा सदैव मोह मायेने युक्त असतो हे दर्शवण्यासाठी अनंत धागा हा रेशमाचा गुंफलेला असतो.अनंत चतुर्दशीच्या दिवशी अनंताचा दोरा 14 धाग्यांचा,पूजेची आवरणे 14,तसेच पत्री व पुष्पांची संख्या ही 14 असते.अनंतचतुर्दशी अर्थात 14 या संखेला विशेष महत्त्व आहे .
उदय व्याप्तीनी दोन मुहूर्त अधिक चतुर्दशीचे दिवशी हे व्रत्त करावे.चतुर्दशी दोन मुहूर्ता पेक्षा कमी असता त्रयोदशीचे दिवशी आणि अहोरात्र चतुर्दशी असता अहोरात्रच्या दिवशी करावे असे शास्त्र आहे .
हे काम्यव्रत असून गतवैभव परत मिळावे यासाठी हे व्रत केले जाते.काही जण 14 वर्षे झाल्यावर या व्रताचे उद्यापन करतात आणि काही जण पुढे कुलाचार म्हणून करीत राहतात.या व्रत्तामध्ये अनंत,शेष व यमुना या देवतांचे पूजन करून अनंताचा दोरा धारण केला जातो.हे व्रत्त श्रीकृष्णांनी युधिष्ठिरास सांगितले होते.
लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यपूर्वकाळात अनंत चतुर्थी पर्यंत गणपती उत्सव सार्वजनिक स्वरूपाचा केल्याने अनंत चतुर्दशीला उत्सवाचे स्वरूप आले आहे.वास्तविक हा दिवस आनंत पूजन व्रताचा आहे .
लेखन : प्रभाकर जंगम (लेखक हे प्रसिद्ध ज्योतिषशास्त्री व वास्तुसल्लागार आहेत)
प्रभाकर जंगम
(ज्योतिषशास्त्री,वास्तुसल्लागार)
मो. 9860825993
ज्योतिष,वास्तु,डाऊझिंग आणि योग सल्लागार)
ज्योतिषशास्त्री -महाराष्ट्र ज्योतिष परिषद मुंबई.
वास्तू पदविका- कवि कुलगुरू कालिदास विश्वविद्यालय रामटेक.
योग शिक्षक,प्रविण-योग गुरुकूल, नाशिक
मंगल ज्योतिष केंद्र, विनायक नगर,इस्लामपूर जि. सांगली.