बारावीच्या निकालासाठी बोर्डाकडून 4 नव्या वेबसाईट जारी
उद्या दुपारी 4 वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पाहता येणार
मुंबई : दहावीचा निकाल लागल्यानंतर आता बारावीचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागून आहे. उद्या बारावीचा निकाल लागणार आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.उद्या दुपारी 4 वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे.
उद्या मंगळवारी दुपारी 4 वाजता इयत्ता बारावीचा निकाल लागणार आहे.ऑनलाईन पद्धतीने हा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना साईटवरून रिझल्ट डाऊनलोड करूनही घेता येणार आहे. निकाल लागल्यावर विद्यार्थी एकाच साईटवर जाऊन निकाल पाहतात. त्यामुळे एकाचवेळी साईटवर लोड आल्याने सर्व्हर डाऊन होतो. परिणामी निकाल पाहता येत नाही. विद्यार्थ्यांची ही गैरसोय होऊ नये म्हणून परीक्षा मंडळाने चार साईट्स लॉन्च केल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक साईट्सवर निकाल पाहता येणार आहे. परिणामी विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही.
निकाल पाहण्यासाठी या संकेतस्थळांना भेट द्या
1. https://hscresult.11 thadmission.org.in
www.mahresult.nic.in व https://msbshse.co.in या संकेतस्थळावर विदयार्थ्यांच्या निकालाशिवाय निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.
तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.
असे मिळणार गुण
बारावीची परीक्षा रद्द झाल्यानंतर बारावीचे निकाल जाहीर करताना दहावी, अकरावी आणि बारावी या तिन्ही वर्गाचे गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. त्यासाठी 30 :30 :40 असा निकष राज्य मंडळाने जाहीर केला आहे. यामध्ये इयत्ता दहावीच्या परीक्षेतील सर्वाधिक गुण मिळालेल्या 3 विषयांचे सरासरी गुण (30%),अकरावीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण (30%) आणि इयत्ता बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा ,सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन गुण (40%) अशा प्रकारचे गुण एकत्र करून बारावीचे निकाल जाहीर केले जाणार आहे