Last Updated on 05 Nov 2023 7:50 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली । भारताच्या अध्यक्षतेखाली यशस्वीपणे संपन्न झालेल्या दोन दिवसीय G-20 शिखर परिषदेत अनेक देशांच्या राष्ट्रप्रमुखांचा सहभाग होता.या काळातील अनेक संस्मरणीय छायाचित्रे समोर आली आहेत.त्याच वेळी,परिषदेच्या बाजूला झालेल्या बैठकीदरम्यान,ब्रिटीश पंतप्रधान ऋषी सुनक आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचा एक फोटो व्हायरल झाला आहे,ज्यामध्ये ब्रिटीश पंतप्रधान सुनक हे गुडघ्यावर बसून शेख हसीना यांच्याशी बोलत आहेत
या फोटोने इंटरनेटवर बरेच लोक आकर्षित झाले आहेत.हा हृदयस्पर्शी फोटो लोक सोशल मीडियावर शेअर करत आहेत.
दरम्यान,ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे रविवारी सकाळी पावसात पत्नी अक्षता मूर्तीसह दिल्लीतील अक्षरधाम मंदिरात पोहोचले आणि त्यांनी स्वामी नारायणाचे दर्शन घेतले.तत्पूर्वी, सुनक हे पत्नी अक्षता यांच्यासह राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आयोजित केलेल्या डिनरलाही हजेरी लावली होती.









































































