सांगली । वाळवा तालुक्यातील बोरगाव येथील गायवर्ग पशु पालकांसाठी लम्पी चर्मरोग प्रतिबंधासाठी ग्रामपंचायतीवतीने 15 व्या वित्त आयोगातून मोफत औषध पुरवठा करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.असा महत्वपूर्ण निर्णय घेणारी बोरगाव ग्रामपंचायत जिल्ह्यात पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.
माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पाटील हे लोकनियुक्त सरपंच झाल्यापासून गावासाठी विविध उपक्रम राबवत आहेत.विकासकामांबरोबरच ग्रामपंचायतीने घेतलेल्या निर्णयांची माहिती जनतेला व्हावी यासाठी त्यांनी ग्रामपंचायतीची मासिक सभा सर्वांसाठी खुली ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.आता गायवर्ग पशु पालकांसाठी लम्पी चर्मरोग प्रतिबंधासाठी मोफत औषध पुरवठा करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
हेही वाचा – चांद्रयान-3 : चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या पृष्ठभागाबाबतचा मोठा खुलासा…
गावामध्ये अनेक जनावरांना लम्पी चर्मरोगाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.काही जनावरे लम्पी चर्मरोगाने बाधित झाली होती.त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय हा मोफत औषध पुरवठा निर्णय घेतला आहे.
दरम्यान,बोरगावमधील गायवर्ग पशु पालकांसाठी लम्पी चर्मरोग प्रतीबंधासाठी ग्रामपंचायत बोरगावच्या वतीने 15 वा वित्त आयोग व ग्रामपंचायत फंडातून मोफत औषध पुरवठा करण्याचा शुभारंभ जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ.अजयनाथ थोरे (पाटील),जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.किरण पराग,गटविकास अधिकारी डॉ.आबासाहेब पवार,सहा.आयुक्त पशुसंवर्धन डॉ.बापूसाहेब माळवदे,पशुधन अधिकारी डॉ.कपिल खंडाळे,पशुधन अधिकारी डॉ.सचिन वंजारी आदींच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी करण्यात आला.
हेही वाचा – शिक्षिका मृणाल गांजाळे यांना यंदाचा ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’
स्वागत व प्रस्ताविक लोकनियुक्त सरपंच जितेंद्र पाटील यांनी केले.ग्रामपंचायत सदस्य रोहिणी पाटील,जोहाराबी मुल्ला,बाळासाहेब कांबळे,ग्रामविकास अधिकारी बादशहा नदाफ,माजी उपसरपंच सचिन देसाई,हेमंत पाटील,अधिक पाटील,डॉ.मुसा मुल्ला,डॉ.संदीप फारणे,डॉ.हणमंत पाटील,डॉ.दिनकर कुंभार,डॉ.जिवाजी शिंदे,डॉ.कुमार पिसाळ तसेच सर्व पशुपालक व ग्रामस्थ उपस्थित होते.त्यावेळी लम्पी चर्मरोग आजारवर प्रतीबंध करण्यासाठी उपस्थित सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी पशुपालकांना मार्गदर्शन केले.आभार उपसरपंच सचिन पाटील यांनी मानले.लम्पी चर्मरोगाचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी माशा,डास,गोचडी निर्मूलनासाठी औषध पावडर डबे तयार करण्यात आले असून असे 400 डबे गायवर्ग पशु पालकांना यावेळी देण्यात आले.