Last Updated on 22 Sep 2022 9:55 AM by Sanjay Patil/Adhorekhit
![]()
फोन केल्यावर किंवा उचलल्यावर आपण ‘हॅलो’च का म्हणतो?
हॅलो व्यतिरिक्त दुसरे काही फोन उचलल्यावर का बोलले जात नाही?
![]()
आपण फोन उचलल्यानंतर सर्वसाधारण हॅलो हाच शब्द उच्चारतो आणि मग महत्वाचे विषय बोलण्यास सुरुवात करतो. पण यापूर्वी कधी असा विचार केला आहे का फोन उचलल्यानंतर सर्वचजण हॅलोच का उच्चारतात ? त्यासाठी पर्यायी शब्द का उच्चारत नाही. यासंदर्भात वेगवेगळ्या दंतकथा आहेत. पण त्याला सत्याची जोड नाही. पण आम्ही आज तुम्हाला याबद्दलची माहिती देणार आहोत.
अलेक्झांडर ग्राहम बेल यांनी टेलिफोनचा आविष्कार केला होता. त्यांना 7 मार्च 1876 मध्ये टेलिफोन आविष्काराचे पेटेंट मिळाले. बेल यांनी फोनचा आविष्कार केल्यानंतर सर्वातआधी त्यांचे मित्र वॉट्सन यांना एक संदेश पाठवला. प्रिय वॉट्सन येथे येशील का मला तुझी गरज आहे. हे फोनवर बोलताना ग्राहम बेल हे हॅलो नाही तर Ahoy असे बोलायचे.
टेलिफोनच्या आविष्कारानंतर लोकांनी जेव्हा याचा वापर सुरू केला, तेव्हा सर्वातआधी लोक विचारत होते की, Are you there. ते हे यासाठी करत होते की, त्यांना कळावे की, दुसरीकडे त्यांचा आवाज पोहोचतो आहे. पण असे म्हणतात की, थॉमसन एडिसन यांनी एकदा Ahoy हे चुकीचे ऐकले आणि त्यांनी 1877 मध्ये हॅलो म्हणण्याचा प्रस्ताव ठेवला.
थॉमस एडिसनने हा प्रस्ताव मंजूर करून घेण्यासाठी पिट्सबर्गच्या सेंट्रल डिस्ट्रिक्ट अॅन्ड प्रिंटिंग टेलिग्राफ कंपनीचे अध्यक्ष टीबीए स्मिथ यांना पत्र लिहून सांगितले की, ‘हॅलो’ हा टेलिफोनवर पहिला उच्चारला जाणारा शब्द असावा. त्यांनी जेव्हा पहिल्यांदा फोन केला तेव्हा ते हॅलो असेच म्हणाले. फोनवर उचलल्यावर हॅलो म्हणण्याची पद्धत तेव्हापासून सुरू झाली.
अलेक्झांडर ग्राहम बेलने 2 जून 1875 रोजी टेलिफोनचा शोध लावला. मात्र, त्याच्या पेटंटसाठीही त्याला खूप कष्ट घ्यावे लागले. त्याला 7 मार्च 1876 रोजी दूरध्वनीचे पेटंट मिळाले. आज, जेव्हा आपण टेलिफोन किंवा मोबाईलवर फोन करतो, तेव्हा सर्वप्रथम आपण ‘हॅलो’ म्हणूनच बोलायला सुरुवात करतो. ग्राहम बेलने त्याची मैत्रीण ‘मार्गारेट हॅलो’मुळे फोनवर हॅलो म्हटले आणि तेच प्रत्यक्षात पुढे सुरु झाले असे म्हटले जाते.
वास्तविक, दूरध्वनीवर संभाषण सुरू करण्यापूर्वी, ‘आर यू देअर किंवा आर यू रेडी टू टॉक’ अर्थात ‘तुम्ही तिथे आहात? किंवा तुम्ही बोलण्यास तयार आहात?’ सारखी वाक्ये अनेकदा बोलली गेली. अमेरिकन टेलिग्राफ आणि टेलिफोन कंपनीच्या कागदपत्रांनुसार, अमेरिकन शास्त्रज्ञ थॉमस एडिसनला इतके लांब वाक्य आवडले नाही. जेव्हा त्याने पहिल्यांदा फोन केला तेव्हा त्याने चुकून ‘हॅलो’ वापरला आणि हा शब्द अंमलात आला.
![]()









































































