Last Updated on 14 Aug 2023 9:53 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । संपुर्ण देशभर हर घर तिरंगा अभियान २ यशस्वीपणे राबविण्यात येत आहे,सांगली जिल्हा भाजपाचे अध्यक्ष निशिकांत भोसले- पाटील (दादा) यांच्या मार्गदर्शनाखाली उरूण-इस्लामपुर शहरासह इस्लामपुर विधानसभा मतदार संघात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे.
यावेळी भाजपाचे सांगली जिल्हा अध्यक्ष निशिकांत भोसले- पाटील म्हणाले,दि.१५ ऑगस्ट हा संपुर्ण देशभर स्वातंत्र्य दिन म्हणुन साजरा केला जातो.स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने संपुर्ण देशभर मेरा माटी, मेरा देश,फाळणी दिन, हर घर तिरंगा ,वृक्षारोपन सह विविध कार्यक्रमाचे आयोजन देशातील बांधव करीत आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारातुन या कार्यक्रमाचे नियोजन सर्व स्तरावर होत आहे,या उपक्रमांना मोठा प्रतिसाद मिळत आहे.

उरूण- इस्लामपुर,आष्टा शहरासह इस्लामपुर विधानसभा मतदार संघामध्ये हर घर तिरंगा अभियान २ भाजपा पदाधिकारी,कार्यकर्ते गावो गावी राबवित आहेत.
वाळवा तालुका भाजपाचे अध्यक्ष धैर्यशील मोरे,महिला मोर्चा च्या अध्यक्षा सुरेखाताई जगताप,वाळवा तालुका भाजपा ओबीसी सेल चे अध्यक्ष मधुकर हुबाले,युवा मोर्चाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील,भाजपा शहर अध्यक्ष अशोकराव खोत,भाजपा संघटन सरचिटणीस संदीप सावंत,प्रविण परीट,सरचिटणीस दादासाहेब रसाळ,यदुराज थोरात,निवास पाटील,रणजीत माने,युवा नेते अजित पाटील,अक्षय पाटील,संदीपराज पवार,अल्ताफ तहसिलदार,योगेश यमगर,रणधीर जाधव आदिसह अन्य मान्यवर अभियान यशस्वितेसाठी घरो घरो पोहचुन माहिती देत आहेत.









































































