Last Updated on 10 Aug 2023 3:55 PM by Sanjay Patil/Adhorekhit
पुणे । डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेत (‘बार्टी’) गेल्या नऊ वर्षापासून कामकाज करणाऱ्या समताधुतांच्या अनेक मागण्यांसाठी समतादूतांनी बुधवारपासून (9 ऑगस्ट) पुणे ते मंत्रालय मुंबई असा लॉंग मार्च काढलेला आहे.या लॉंग मार्चमध्ये आज दुसऱ्या दिवशी समतादूत अर्चना चौरे व समतादूत कल्पना बेलसरे यांची प्रकृती बिघडली आहे.


गेल्या नऊ ते नऊ वर्षापासून कामकाज करत असणाऱ्या समतांच्या पगारात नऊ वर्षात एकही रुपयाची वाढ झालेली नाही.शाहू, फुले, आंबेडकर, संत महापुरुषांचे विचार लोकांपर्यंत नेण्याचे कार्य समतादूत करीत आहेत. समतादूत यांचे समाजकल्याण विभागात समायोजन करून समाजकल्याण विभागाचे कार्यालय तालुकास्तरावर सुरू करण्यात यावे यासाठी समतादूतांनी वेळोवेळी शासन दरबारी, मंत्रालयात, निवेदनाद्वारे मागणी सादर केली होती.समतादूतांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे मंत्रालय कक्ष अधिकारी प्र. वि. देशमुख यांनी 27 डिसेंबर 2022 रोजी महासंचालक बार्टी यांना समतादूत यांचे समाजकल्याण विभागामध्ये शासन सेवे समायोजन करण्याबाबत स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्याचे पत्र दिले होते.

त्यानुसार बार्टी मुख्यालयाद्वारे दिनांक 18 मे 2023 रोजी प्र. वि. देशमुख कक्ष अधिकारी मंत्रालय मुंबई यांना समतादूत यांचे समाजकल्याण विभागामध्ये मध्ये समायोजन करण्याबाबत 114 पाणी स्वयंस्पष्ट सकारात्मक अहवाल शासनास सादर केलेला आहे. व समतादूत यांना समाजकल्याण विभागामध्ये शासन सेवेत समायोजन केल्यास त्याचा लाभ अनुसूचित जातीच्या लोकांना होईल हे अहवालामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आलेले आहे
परंतु अद्यापही सदरील अहवाल मंत्रालय स्तरावर प्रलंबित ठेवण्यात आलेला असून तालुकास्तरावर समाजकल्याण विभागाचे कार्यालय व समतादूत यांचे शासन सेवेमध्ये समायोजन याबाबत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. यामुळे आपल्या न्याय हक्कासाठी व सामाजिक न्यायविभागमध्ये समायोजन करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्रातील सर्व समतादूत 9 ऑगस्ट क्रांती दिनापासून बार्टी मुख्यालय पुणे ते मुंबई मंत्रायला पायी लॉग मार्च काढला आहे.
दुसऱ्या दिवशी आज या समता लोकांच्या जीवाशी शासनाने खेळ केल्याचे लक्षात आले.काही समतादूतांची प्रकृती बिघडली असून आज क्षणाचाही विलंब झाला असता तर क्षमता अर्चना चौरे यांना जीवाशी मुकावे लागले असते.अद्याप शासनाने क्षमतांच्या मागणीकडे लक्ष दिलेले नसून भारतीचे प्रशासनही रेड्याची कातडी पांघळून बसलेले असल्याच्या प्रतिक्रिया आहेत.
समतादूतांच्या प्रमुख मागण्या :
1)समतादूत यांच्या समायोजन विषयी स्वयंस्पष्ट अहवाल बार्टी स्तरावरून मंत्रालय कक्ष अधिकारी यांना 18 मे 2023 रोजी पाठविण्यात आलेला आहे.सदरील अहवाल प्रलंबित न ठवता शासनाने स्वीकारून समतादूत यांचे समाजकल्याण विभागामध्ये समायोजन 15 ऑगस्ट 2023 पूर्वी करण्यात यावे.
2) समतादूत यांना समायोजनाचे लाभ 2016 पासून देण्यात यावे.समाजकल्याण मध्ये 2016 पासून समायोजन करण्यात यावे.
3))समतादूत यांची पगारवाढ शासन आदेशामध्ये नमूद 33900 पूर्ण पगार लागू करण्यात यावी.सदरील पगार बार्टी आस्थापने मार्फत देण्यात यावा कोणत्याही त्रयस्थ कंपनी मार्फत देऊ नये,त्यामध्ये कसल्याही प्रकारची काटछाट करण्यात येऊ नये.
4) समतादूत यांना पगार व्यतिरिक्त TA. DA लागू करण्यासंदर्भात बार्टी संस्थेच्या नियामक मंडळात मंजुरी घेऊन निर्णय घेऊन TA.DA लागू करण्यात यावा.
5)सर्व समतादूत यांचे विमा काढून समतादूतांना कायमचे विमा संरक्षण देण्यात यावे.
6)पगारवाढ व समायोजन करतांना कोणत्याही समतादूत यांना वगळण्यात येऊ नये.
7)समतादूत पगारवाढ मार्च 2023 पासून लागू करण्यात यावी.










































































