Last Updated on 26 Jun 2023 12:59 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । लांगुलचालनापेक्षा लोकशाहीने देश जिंकता येतो हा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला दिला आहे.भविष्यात भारत देशाला मोठी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी 56 इंच छाती असणारा मोदी सारखा नेता देशाला पाहिजे. देशातील प्रादेशिक मान्यता असणारे पक्ष संपुष्टात येतील आणि आगामी निवडणुका दोन पक्षातच होतील अशी अपेक्षा लेखक व पत्रकार उदय निरगुडकर यांनी व्यक्त केली.
मोदी @9 या अभियान अंतर्गत भाजप जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत पाटील आयोजित ‘भारत आज काल आणि उद्या’ या व्याख्यान कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी भाजप संघटन मंत्री मकरंद देशपांडे माजी आमदार भगवानराव साळुंखे,प्रकाश शिक्षण व आरोग्य संकुलाच्या मार्गदर्शिका सुनिता भोसले-पाटील,तालुकाध्यक्ष धैर्यशील मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.दरम्यान आणिबाणीच्या काळात काम केलेल्या श्रीकांत शिंदे,सुभाष कुलकर्णी,अवधुत ठोसर,गजानन पटवर्धन यांचा सत्कार निरगुडकरांच्या हस्ते करण्यात आला.
निरगुडकर म्हणाले,आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत देशाच्या अर्थकारणावरून देशाचे मूल्यमापन ठरत असते सध्या भारताचे ठोस उत्पन्न 7.2 टक्के तर शेतीचे उत्पन्न चार टक्क्यांनी वाढले आहे देशातील खरीप व रब्बी पिकात मोठ्याने वाढ झाली आहे.गेल्या वर्षी 1 लाख 60 कोटी जीएसटी गोळा झाला होता.यावर्षी 1 लाख 87 हजार कोटी रुपये जीएसटी गोळा झाला आहे.डिजिटल ऑनलाइन व्यवहारामध्ये भारत एक नंबरवर आहे.
निरगुडकर पुढे म्हणाले, कोरोनाच्या महामारीत नरेंद्र मोदी सरकारने शंभर दिवसाच्या आत लसीकरण पूर्ण केले तसेच 80 देशांना मोफत लस पुरवली ही लस करत असताना राष्ट्र छोटे किंवा मोठे हा भेदभाव मोदींनी केला नाही.कोरोना काळात अमेरिकेत मृत्यू दर पाचपट होता मात्र भारतात सर्वात कमी मृत्यूदर होता.युक्रेन युद्धाच्या वेळी अडकलेल्या भारतीयांना स्वदेशी परत आणण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी थोडाकाळ युद्धाला स्थगिती आणली होती.काश्मीरमध्ये कलम 370, राम मंदिर निर्णय, तीन वेळा तलाकचा निर्णय झाला.मात्र हा निर्णय झाल्यानंतर एकाही हिंदू किंवा मुस्लिमावर दगड उचलला गेला नाही किंवा दंगाही झाला नाही.त्यामुळे देशात युद्ध नाही बुद्ध हे फक्त मोदींनी घडवून आणले.आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानला एकटे पाडण्याचे काम या सरकारने केले आहे.
मन की बात चा प्रयोग जगात कोणत्याही देशाने केलेला नाही.मन की बात च्या माध्यमातून ज्योत से ‘ज्योत जला के चलो ‘चा नारा देत राष्ट्र जागृत करण्याचे काम केले आहे.देशात एक सुसूत्रता,आंतरराष्ट्रीय एकात्मता,समाज सदृढ असावा.हा मेसेज मन की बात ने देशभर पसरला आहे.2047 पर्यंत भारत कसा असावा या दृष्टीने या सरकारचे काम चालू आहे.देशातील नद्या मरत चाललेले आहेत.म्हणून मोदींनी नद्यांचे उत्सव साजरे करायला लावले.देशात गुगलवर जगणारा आणि गुगल शिवाय जगणारा भारत आहे.या दोघांना जोडणारा दुवा म्हणजे नरेंद्र मोदी असल्याची भावना शेवटी उदय निरगुडकर यांनी व्यक्त केली.
स्वागत व प्रास्ताविक भाजपा शहर अध्यक्ष प्रविण परीट यांनी केले,आभार डाॅ.सतिश बापट यांनी मानले.
यावेळी उपाध्यक्ष निवास पाटील,संजय हवलदार,संजय पोरवाल,मधुकर हुबाले,सुरेखा जगताप,प्रविण माने,संजय भागवत,राजेश मंत्री,चंद्रकांत पाटील,माजी नगरसेवक एल.एन.शहा,भास्कर कदम,भास्कर मोरे,भाजपा गजानन फल्ले,अक्षय पाटील,राहुल पाटील,संचालक पोपट पवार,शहर भाजपाच्या महिला युवती अध्यक्षा स्मिता पवार,निशिकांत दादा स्पोटर्स फौंडेशनचे संस्थापक अजित पाटील,भाजपाचे संघटन सरचिटणीस संदीप सावंत,सरचिटणीस यदुराज थोरात,रणजीत माने आदिसह अन्य मान्यवर उपस्थित होते.












































































