Last Updated on 25 Jun 2023 1:18 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । आष्टा येथील कासेगाव शिक्षण संस्थेच्या आर्ट्स,कॉमर्स अॅण्ड सायन्स काॅलेज मध्ये आजची काळाची गरज ओळखून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची सोय व्हावी म्हणून आ.जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इंजिनिअरिंग,मेडिकल,फार्मसी व ॲग्री प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेची तयारी ‘आष्टा पॅटर्न’ अतंर्गत करुन घेतली जाणार आहे.
त्यासाठी 11 वी व 12 वी सायन्ससाठी MCQ बेस्ड 300 टेस्ट घेतल्या जाणार असल्याची माहिती कासेगांव एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव व महाविद्यालयीचे प्राचार्य डॉ.राजेंद्र कुरळपकर यांनी दिली.
ते पुढे म्हणाले,या पॅटर्न अंतर्गत टेस्ट सिरीज,डाऊट क्लीअर सेशन,ॲन्सर कीज,अनेक नामवंत कंपन्याचें प्रश्न संच इ.गोष्टी केल्या जाणार आहेत.त्यामुळे आष्टा व परिसरातील विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळून राज्यातील नामवंत महाविद्यालयात प्रवेश मिळणार आहे.दर्जेदार शिक्षणासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले जाणार आहेत.यासाठी संस्थेचे अध्यक्ष शामराव पाटील व सचिव प्राचार्य आर.डी.सावंत यांचे सहकार्य मिळत आहे.
गेल्या वर्षांपासून बी.एस्सी. भाग तीन चा वर्ग सुरु झाला असून केमिस्ट्री,काॅम्पुटर सायन्स,मायक्रो,मॅथ्स असे स्पेशल विषय सुरु करण्यात आले आहेत.नोकरी,व्यवसाय साठी उपयुक्त असणारे विषय बी.एस्सी साठी सुरु करण्यात आले आहेत.आष्टा पॅटर्न व बी.एस्सी मुळे परिसरातील मुलामुलींना मोठ्या शहरात जाण्याची गरज भासणार नाही.त्यामुळे पालकांचा वेळ व पैसा वाचेल आणि दर्जेदार शिक्षण ही मिळेल.
महाविद्यालयात 11,12 वी कला व वाणिज्य,बी.ए, बी.काॅम बरोबर एम.ए.,एम.काॅम हे पदव्युत्तर वर्ग ही सुरु आहेत.तसेच मुला व मुलींसाठी एन.सी.सी. व एन.एस.एस.ची सोय आहे.अतिशय सुंदर व सर्व सोयीनीयुक्त इनडोअर स्पोर्ट्स हाॅल,400 मी.ट्रॅक,स्टेडियम या सुविधा आहेत.अनेक खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकले आहेत.या सोयीमुळे क्रिडा क्षेत्रात करिअर करण्याची चांगली संधी उपलब्ध होणार आहेत.









































































