Last Updated on 24 Jun 2023 1:39 PM by Sanjay Patil/Adhorekhit
आरआयटीला पुढील 10 वर्षासाठी विनाअट स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा
सांगली । इस्लामपूर येथील कासेगाव शिक्षण संस्थेच्या राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आरआयटी) या आपल्या स्वायत्त महाविद्यालयास रोबोटिक्स अँण्ड ऑटोमेशन या अभियांत्रिकी पदवीच्या नव्या शाखेस अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषद (एआयसीटीई) कडून परवानगी मिळाली आहे.राज्यातील 400 अभियांत्रिकी महाविद्यालयापैकी केवळ 14 महाविद्यालया त हा अभ्यासक्रम शिकविला जातो. आम्ही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम उपलब्ध करून दिला असल्याची माहिती कासेगाव शिक्षण संस्थेचे सचिव आर.डी. सावंत,आरआयटीचे संचालक डॉ.पी.व्ही. कडोले यांनी दिली.
सध्या आरआयटीमध्ये शिकविल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक्स अँन्ड टेली कम्युनिकेशन शाखेची विद्यार्थी क्षमता 60 वरून 120 करण्यास एआयसीटीईची मान्यता मिळाली असून आरआयटीला पुढील 10 वर्षासाठी विनाअट स्वायत्त महा विद्यालयाचा दर्जा मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.
आम्ही माजी मंत्री आ.जयंतराव पाटील,आरआयटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष भगतसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वेगाने बदलत असणाऱ्या तंत्रज्ञानाचा मागोवा घेत भविष्यात मागणी असणारे अभियांत्रिकी शिक्षण विद्यार्थ्यांना देत आहोत.स्वयंचलित तंत्रज्ञानाचा सर्व क्षेत्रासह माणसाच्या दैनंदिन जीवनात वापर केला जात असून भविष्यात संरक्षण,शेती आदी सर्वच क्षेत्रात याचा मोठया प्रमाणात वापर होणार आहे. या पार्श्वभूमीवर या अभ्यासक्रमाला मोठे महत्व आहे. कॅम्पस मार्फत या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया पार पडून लवकरच वर्ग सुरू होतील.या अभ्यासक्रमासाठी आम्ही अद्यावत यंत्रणा उभा केली आहे. ही पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यां ना करिअरच्या मोठ्या संधी मिळणार आहेत.
पूर्वी मॅकॅनिकल शाखेस महत्व होते.आता संगणक आणि आयटीला महत्व आहे.काळाप्रमाणे हे चालत असते.अभियांत्रिकी मधील कोणतीही शाखा कमी किंवा जास्त नसते.सध्या एकाच अभियांत्रिकी शाखेत पारंगत होण्याचे दिवस संपले आहेत.सर्वच शाखा एकमेकास पूरक आहेत. आरआयटी मध्ये शिकलेले असंख्य विद्यार्थी देशासह परदेशातही प्रभावी काम करीत आहेत.आम्ही स्टार्ट अपमधून उद्योजक घडविण्यासाठी अनेक उपक्रम राबवित आहोत.
उद्योजक नंदन निलकेणी यांनी मुंबई आय आयटीस 315 कोटी रुपयांची भरीव आर्थिक मदत केली आहे. अशा पद्धतीने समाजातून मदत मिळू लागल्यास शिक्षण संस्था समाज निर्मितीचे काम जोमाने करू शकतील. सध्या संस्थांच्यासमोर गुणवत्ता टिकवीत संस्था चालविण्याचे मोठे आव्हान आहे. तसेच नव्या शैक्षणिक धोरणाचे काही चांगले,तसे काही वाईट परिणामही होणार आहेत. आरआयटी नेहमीच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मानांकनात अग्रेसर राहिल्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांना बहु राष्ट्रीय कंपन्यामध्ये चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळत आहेत,असेही प्राचार्य सावंत, आणि डॉ.कडोले यांनी सांगितले.
यावेळी स्टुडन्ट डेव्हलपमेंट डिन डॉ.एल. एम.जुगुलकर,रिसर्च डिन डॉ.ए.बी.काकडे रजिस्टार सारिका पाटील,डॉ.एस.आर.कुंभार डॉ.के.एस.पाटील उपस्थित होते.











































































