Last Updated on 19 Jun 2023 8:21 AM by Sanjay Patil/Adhorekhit
‘मोदी @9’ महाजनसंपर्क अभियान अंतर्गत वाळवा तालुक्यात विविध कार्यक्रम
गृहमंत्री अमित शहा,भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची लवकरच इस्लामपुरात सभा होणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने ९ वर्षांत सर्वांसाठी कल्याणकारी योजना राबवल्या : निशिकांत भोसले-पाटील
सांगली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारकडून 9 वर्षांत समाजातील सर्व घटकांसाठी कल्याणकारी योजना राबवण्यात आल्या. या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात ‘मोदी @9’ अभियान राबवण्यात येत असल्याची माहिती इस्लामपूर विधानसभा मतदार संघाचे प्रमुख व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांनी इस्लामपूर येथे आयोजित पत्रकार बैठकीत दिली.विकास कामांची पुस्तिका 60 हजार घरात पोहोच करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.मतदारसंघात ‘मोदी @9’ जनसंपर्क अभियान 20 ते 30 जूनअखेर राबविण्यात येत आहे.यावेळी हातकणंगले लोकसभा क्षेत्राचे निवडणूक प्रमुख सत्यजित देशमुख उपस्थित होते.
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला 9 वर्ष पूर्ण होत आहेत.त्यानिमित्ताने संपूर्ण देशभरामध्ये मोदी@9 महाजनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून झालेल्या विकास कामांची माहिती व विविध योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.या अभियानाची माहिती देण्यासाठी इस्लामपूर येथे माजी नगराध्यक्ष, सांगली जिल्हा भाजपा उपाध्यक्ष निशिकांत पाटील व हातकणंगले लोकसभा क्षेत्राचे निवडणूक प्रमुख सत्यजित देशमुख यांच्या उपस्थितीत प्रकाश हॉस्पिटल येथे पत्रकार बैठक पार पडली.यावेळी केंद्रातील मोदी सरकारने गेल्या नऊ वर्षात केलेल्या विधायक व विकासात्मक कामाचा लेखा जोखा त्यांनी मांडला.
निशिकांत भोसले पाटील म्हणाले, 24 जूनला सायंकाळी 6 ला ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर यांचे राजारामबापू नाट्यगृहात बुद्धिवंतांच्या उपस्थितीत व्याख्यान होणार आहे.तसेच योगा दिन, घरोघरी संपर्क, ‘मन की बात’, लाभार्थी संपर्क, बुद्धिवंत संमेलन, व्यापारी संमेलन, सोशल मीडिया, ज्येष्ठ कार्यकर्ता सत्कार, विकासतीर्थ, संयुक्त मोर्चा संमेलन, लाभार्थी संमेलन आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. येत्या निवडणुकीत 400 हून अधिक खासदार निवडून आणणे आणि हातकणंगले मतदार संघातून भाजपच्या विचाराचा खासदार निवडून आणण्याचा प्रयत्न आहे.या अभियानांतर्गत लवकरच गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची इस्लामपुरात सभा होणार असल्याचीही त्यांनी माहिती दिली.
सत्यजित देशमुख म्हणाले, ‘मोदी @9’ हे एक महिन्याचे अभियान शीघ्र गतीने कार्यन्वित होण्यासाठी आम्ही पावले उचलली आहेत.भाजपने नेमकी काय कामे केली आहेत, काय करणार आहोत,आपली उद्याची ध्येयदृष्टी काय,या संदर्भात आमचे मंडल मागोवा घेणार आहे.
यावेळी वाळवा तालुका भाजपाचे अध्यक्ष धैर्यशील मोरे,उपाध्यक्ष निवास पाटील,वाळवा तालुका भाजपा ओबीसी सेल चे अध्यक्ष मधुकर हुबाले,वाळवा तालुका भाजपा महिला आघाडी च्या अध्यक्षा सुरेखाताई जगताप,वाळवा तालुका भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील,भाजपाचे जिल्हा सरचिटणीस संजय हवलदार,जिल्हा कोषागार संजय पोरवाल,भाजपाचे शहर उपाध्यक्ष आबासाहेब मोरे,माजी नगरसेवक एल. एन.शहा,भाजपाचे संघटन सरचिटणीस संदीप सावंत,सरचिटणीस दादासाहेब रसाळ,यदुराज थोरात,भाजपा शहर संघटन सरचिटणीस प्रविण परीट,युवा नेते अजित पाटील आदी सह अन्य मान्यवर उपस्थित होते.











































































