चाटे कोचिंग क्लासेस व चाटे ज्यु. कॉलेज ऑफ सायन्सच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
कोल्हापूर । वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशासाठी नॅशनल टेस्टींग एजन्सी (एन.टी.ए) मार्फत दि. ७ मे रोजी घेण्यात आलेल्या नीट-२०२३ परीक्षेचा निकाल नुकताच वेबसाईटवर जाहिर झाला असून या परीक्षेत चाटे समुहाच्या चाटे कोचिंग क्लासेस व चाटे ज्यु. कॉलेज ऑफ सायन्सच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश कौतुकास पात्र आहे.या परीक्षेत चाटे समुहाची कु. सेजल रमेश राठी ही 720 पैकी 700 गुण मिळवून समुहामध्ये प्रथम आली. याच विद्यार्थीनीने एमएचटी-सीईटी परीक्षेतही १०० पर्सेंटाईल गुण घेऊन महाराष्ट्रात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे.
या परीक्षेच्या निकालामुळे विद्यार्थ्यांचा वैद्यकिय प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला.उज्ज्वल भविष्याची स्वप्ने उराशी बाळगून सातत्यपूर्ण कठोर परिश्रम करणार्या या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन देण्याचे काम चाटे शिक्षण समुहाच्या चाटे पॅटर्नने केले आहे. यापुढील बदलत्या शैक्षणिक धोरणांचा विचार करून चाटे शिक्षण समूह बदलत आहे. भविष्यामध्ये विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याचा सहप्रवासी म्हणून नवनवीन बदल स्विकारून चाटे शिक्षण समूह स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी नेहमीच सज्ज राहणार आहे.
या परीक्षेत चाटे शिक्षण समुहातील विशेष यश संपादन केलेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे – कु. सेजल राठी (700 गुण), निहाल शेख (640 गुण), रितेश लहाने (640 गुण), कु. ऋतुजा शिंदे (635 गुण), कु. सई पाटील (612 गुण), कु. तनुजा सावळे (610 गुण), अपूर्वा चांगुडे (604 गुण), संदेश मिंकीकर (557 गुण), दशरथ पुरोहित (534 गुण), कु. अक्षता माळी (534 गुण), कु. सुजाता बारकडे (530 गुण), तुषार सरगर (530 गुण), निखिल पाटील (529 गुण), कु. वैभवी कचरे (525 गुण), कु. तृप्ती पाटील (512 गुण), कु. आर्या आपके (507 गुण), कु. आदिती बेंद्रे (505 गुण), कु. वैश्णवी डुबल (502 गुण).
विद्यार्थी-पालकांनी चाटे समुहावर दाखविलेला विश्वास आमची जबाबदारी वाढवितो याची आम्हाला जाणीव आहे.म्हणूनच स्पर्धात्मक परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना तयार करण्याची गरज ओळखून आम्ही त्यासाठी सज्ज आहोत.या कार्यपद्धतीचा फायदा विद्यार्थ्यांना भविष्यातील विविध आव्हानात्मक परीक्षांना सामोरे जाताना होईल आणि यशाचा हा प्रवास असाच अखंड सुरू राहील असा विश्वास कोल्हापूर विभागाचे संचालक प्रा.डॉ. भारत खराटे यांनी व्यक्त करून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यातील शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
चाटे शिक्षण समुहाचे संचालक प्रा. मच्छिंद्र चाटे व प्रा. गोपीचंद चाटे, क्लासचे सर्व शाखा व्यवस्थापक,प्राचार्य,शैक्षणिक विभागप्रमुख व समुहाचे सर्व पदाधिकारी,शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी गुणवंतांचे त्यांच्या उज्ज्वल यशाबद्दल अभिनंदन केले व त्यांना पुढील उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या.