Last Updated on 13 Jun 2023 8:01 PM by Sanjay Patil/Adhorekhit
वाळवा-शिराळाचे प्रांताधिकारी डॉ.संपत खिलारी यांची बदली; डॉ.विजय देशमुख कडेगाव-पलुसचे नवे प्रांताधिकारी
पुणे | राज्यातील महसूल विभागातील उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश सोमवारी रात्री उशिरा जारी करण्यात आले.त्यात पुणे विभागातील 12 उपजिल्हाधिकारी तसेच 10 तहसीलदारांचा समावेश आहे.शासनाचे सविव माधव वीर यांनी या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत.वाळवा-शिराळा चे प्रांताधिकारी डॉ संपत खिलारी यांची कोल्हापूरला बदली झाली आहे.तर विजय देशमुख कडेगाव-पलुसचे नवे प्रांताधिकारी असतील.
राज्याच्या महसूल विभागात राज्य सरकारने मोठे फेरबदल केले आहेत.सहाही महसूल विभागातील उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत.त्यात नाशिक विभागातील 6, अमरावती विभागातील 2, मुंबई विभागातील 2, पुणे विभागातील 5, औरंगाबाद विभागातील 11, नागपूर विभागातील 4 उपजिल्हाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
तहसीलदार बदली आदेश असे
उज्वला सोरटे यांची राज्य शेती तहसीलदार फलटण येथून दक्षिण सोलापूर तहसीलदार या रिक्त पदावर बदली करण्यात आली.सोनाली मेटकरी या नियुक्तीच्या प्रतिक्षेत होत्या.त्यांना तहसीलदार वाई या ठिकाणी पदस्थापना देण्यात आली.मिनल भामरे या नियुक्तीच्या प्रतिक्षेत होत्या,त्यांना तहसीलदार (रजा राखीव) विभागीय आयुक्त कार्यालय,पुणे येथे पदस्थापना देण्यात आली.
अनिलकुमार होळकर यांची शिरोळ तहसीलदारपदी नियुक्ती करण्यात आली.लैला शेख यांची तहसीलदार पुरवठा विभागीय आयुक्त कार्यालय पुणे येथे बदली करण्यात आली.अजित पाटील यांची हवेली (संगायो) येथून खंडाळा तहसीलदारपदाची जबाबदारी देण्यात आली.अनिता देशमुख या बदलीच्या प्रतिक्षेत होत्या.त्यांची हवेली (संगायो) येथून राधानगरीच्या तहसीलदार म्हणून पदस्थापना देण्यात आली.माधवी शिंदे यांची तहसीलदार पन्हाळा येथे बदली करण्यात आली.अमरदीप वाकडे यांची सातारा पुनर्वसन तहसीलदार तर अर्चना कापसे नियुक्तीच्या प्रतिक्षेत होत्या.त्यांना तहसीलदार कवठे महांकाळ येथे पदस्थापना देण्यात आली.
उपजिल्हाधिकारी बदली आदेश असे

उपजिल्हाधिकारी विनंती बदली आदेश असे














































































