Last Updated on 09 Jun 2023 1:05 PM by Sanjay Patil/Adhorekhit
Health Tips | काकडीमध्ये पाण्यासोबतच कॅल्शिअम,फायबर,मॅग्नेशिअम,पोटॅशियमसारखी पोषक द्रव्यांसह व्हिटॅमिन बी मुबलक प्रमाणात असते. याशिवाय मधुमेहासाठीही काकडी खाणे चांगले असते,त्यामुळे या काळात काकडीच्या मागणीत मोठ्या प्रमाणावर वाढ होते.
मधुमेहासह रक्तातील साखर कमी करण्यासाठी काकडी मदत करते.याशिवाय काकडीत पोटॅशियम,मॅग्नेशिअम असल्याने ती हृदय रुग्णासाठीही लाभदायक आहे.पोट साफ राहते.
लग्नसमारंभासह अन्य ठिकाणी कोशिंबीर,फ्रूट सलाडसाठी काकडीचा वापर होतो.याशिवाय थंड असल्याने वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञही काकडी खाण्याचा सल्ला देतात.
काकडी खाण्याचे फायदे
अॅंटीऑक्सिडंटचा मुख्य स्त्रोत आहे
अॅंटीऑक्सिडंट्स ते मॉलिक्युल असतात जे शरीरातील ऑक्सीकरण नियंत्रित करतात, ज्यामुळॆ तुम्ही अनेक आजारांपासून सुरक्षित राहतात. चरबीयुक्त आहाराचे ऑक्सीकरण थांबवण्यासाठी आहारामध्ये एखादा असा पदार्थ अॅंटीऑक्सीडंट समाविष्ट केला पाहिजे, हे काम काकडी करते.
जर ऑक्सीकरण नाही थांबले तर ऑक्सीडेटीव्ह तणाव कॅन्सर आणि हृदय, फुप्फुस आणि ऑटोइम्युन सारख्या आजारांचा धोका वाढतो. पण काकडीमध्ये असलेल्या अॅंटीऑक्सिडंट्समुळे हा धोका कमी होतो.
एका अभ्यासामध्ये 30 अॅडल्ट्सना अॅंटी ऑक्सिडंट आवडर आणि काकडीची पावडर देऊन हे दोन्हीही किती प्रभावी आहे याचे मूल्यमापन केले गेले. यामध्ये असे आढळून आले की काकडीची पावडर अॅंटीऑक्सिडंट म्हणून करत असलेले काम करण्यासाठी जास्त प्रभावी आहे.
त्यामध्ये फ्लेवोनाईड आणि टॅनिन ही दोन संयुगे असतात जी आपल्या शरीराला त्रासदायक रॅडिकल्सला रोखण्यासाठी उपयुक्त ठरतात.
वजन कमी करायला मदत करतात
आपण आपल्या जेवण्यामध्ये काकडीचा वापर वजन कमी करण्यासाठी केला जातो. तुम्हाला माहितीये का, वजन कमी करण्यासाठी काकडीचे अजूनही काही फायदे आहेत.
काकडीमध्ये सगळ्यात कमी कॅलरीज असतात.
अंदाजे एक कप (104 Gm) काकडीमध्ये फक्त 16 कॅलरीज असतात. तर एका अख्ख्या काकडीमध्ये 45 कॅलरीज असतात. म्हणजेच जरी तुम्ही काकडी जास्त प्रमाणात खाल्ली तरी यामुळे तुमचे वजन वाढणार नाही.
याशिवाय, काकडीमध्ये असणारे हाय वॉटर कंटेट वजन कमी करायला मात करतात. 3,628 लोकांवर केल्या गेलेल्या 13 वेगवेगळ्या अभ्यासांच्या निष्कर्षातून असे स्पष्ट झाले आहे की भरपूर पाणी असलेल्या आणि कमी कॅलरीज असलेल्या पदार्थांच्या सेवनामुळे वजन कमी करायला मदत करतात.
स्किनसाठी आहे फायदेशीर
आपण अनेकदा पाहिले असेल की महिला किंवा पुरुष आपल्या डोळ्यांवर काकडीच्या चकत्या ठेवतात किंवा काकडीचा रस आपल्या त्वचेवर लावतात.
काकडीमध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि सिलीकॉन असते जे त्वचेला तुकतुकी मिळण्यासाठी खूप फायदेशीर असते. तसेच या सगळ्यांमुळे त्वचेवर चमक येते. काकडीच्या चकत्या करून डोळ्यांवर ठेवल्यामुळे डोळ्याखाली असलेली काळी वर्तुळे कमी होतात.
ब्लड शुगर आणि ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी मदत करते
काकडी खाल्ल्यामुळे ब्लड शुगर लेव्हल कमी करायला आणि डायबिटीसचे कॉम्प्लिकेशन्स कमी करायला मदत करतात.
काकडीच्या रसामध्ये अशी तत्वे असतात जे पॅनक्रियाजला सक्रिय करतात. पॅनक्रियाज सक्रिय झाल्यामुळे शरीरामध्ये इन्शुलिन तयार होते. यानंतर इन्शुलिन डायबिटीसशी लढायला मदत करते.
काकडीमध्ये असलेले फायबर, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असते जे ब्लड प्रेशर नियंत्रणामध्ये ठेवायला मदत करते.
एका रिसर्चमध्ये ब्लड शुगरवर वेगवेगळ्या रोपांमुळे काय प्रभाव पडतो याविषयी अभ्यास केला गेला. यामध्ये असे आढळून आले की काकडी ब्लड शुगर बर्यापैकी कमी करायला इतरांपेक्षा जास्त मदत करते.
तसेच, एका टेस्ट ट्यूब अभ्यासामध्ये आढळून आले की काकडी ऑक्सिडेटीव्ह तणाव कमी करायला आणि डायबिटीसशी संबंधित आजारांपासून वाचण्यात मदत करते.
अन्नपचनाच्या प्रक्रियेमध्ये मदत करते
काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असल्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकून दिले जाते आणि यामध्ये असलेले सॉल्युबल फायबर्स पोट साफ करतात. यामुळे पोटाशी संबंधित आजार होण्याचा धोका कमी होतो तसेच अन्नपचन व्हायला खूप मदत मिळते.
यासोबतच यामध्ये इरेप्सिन नावाचे अॅन्झाइम असते जे पोटासाठी खूप चांगले असते. हे खाल्ल्यामुळे अल्सर, बद्धकोष्ठ, अपचन यासारखे पोटाशी संबंधित आजार होत नाहीत.
तुम्हाला तर माहीतच असेल की पोटामुळेच आपले संपूर्ण आरोग्य नीट राहते.
काकडी खाण्याचे किती फायदे आहेत हे आता तुमच्या लक्षात आले असेलच. म्हणूनच हे फायदे तुम्हाला मिळण्यासाठी काकडीचा तुमच्या रोजच्या आहारामध्ये समावेश करावा.
काकडी खाण्याचे तोटे
अधिक प्रमाणात काकडी खाल्याने रक्त गोठू शकते
संशोधकांच्या माहितीनुसार, काकडीमध्ये व्हिटॅमिन-के असणे हे खूप खास असते. मात्र जास्त प्रमाणात काकडी खाल्यास व्हिटॅमिन – के चे शरीरातील प्रमाण वाढू शकते, ज्यामुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका वाढतो.
जे लोक रक्त पातळ होण्यासाठी औषधांचे सेवन करतात, त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अधिक प्रमाणात काकडी खाऊ नये.
होऊ शकते ॲलर्जी
काकडी जास्त प्रमाणात खाल्याने काही लोकांनी ॲलर्जी झाल्याचे नमूद केले आहे. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, जर तुम्हाला आधीपासूनच जळजळ, श्वास घेण्यास त्रास होणे असा त्रास होत असेल तर अशा परिस्थितीत काकडीचे अधिक सेवन धोकादायक ठरू शकते.
काकडी नेहमी ठराविक प्रमाणात खावी. त्याचे अतिसेवन हानिकारक ठरू शकते.









































































