Last Updated on 03 Jun 2023 9:24 PM by Sanjay Patil/Adhorekhit
गावकऱ्यांची उडवली झोप, गावात 10 तास दहशत
लखीमपूर खेरी (उत्तर प्रदेश) । येथील रामपूर ढाकिया गावात 10 तास दहशत पसरली होती.शुक्रवारी रात्री एका वाघिणीने गावात प्रवेश केल्याने ग्रामस्थांची झोप उडाली. गायीवर हल्ला केल्यानंतर वाघीण एका घरात घुसली.लोकांनी तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता तिने त्यांच्यावर हल्ला केला.गावकऱ्यांनी कशीतरी रात्र जागून काढली.शनिवारी सकाळी वनविभाग आणि दुधवा व्याघ्र प्रकल्पाचे पथक गावात पोहोचले.वाघिणीला जेरबंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र ती घराबाहेर पडताच तिचा मृत्यू झाला.
दैनिक ‘अमर उजाला’ने दिलेल्या वृत्तानुसार,शुक्रवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास एक वाघीण मैलानी रेंजमधील रामपूर ढाकिया गावात घुसली होती. वाघिणीला शांत करण्याआधीच तिचा मृत्यू झाल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.वाघिणीचे वय सुमारे तीन वर्षे आहे ती अनेक दिवसांपासून परिसरात फिरत होती.वाघिण शुक्रवारी रात्री ढाकियाच्या अनेक घरात घुसले.गावकऱ्यांनी त्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला,पण अपयश आले. गावकऱ्यांनी वाघिणीला पळवून लावल्याचा व्हिडिओही समोर आला आहे.

रात्री उशिरापर्यंत वाघिणी गावात इकडे तिकडे धावत राहिली.यानंतर एका घरात प्रवेश केला.दहशतीमुळे ग्रामस्थांनी रात्र जागून काढली.माहिती मिळताच वनविभागाचे पथक वाघिणीला पकडण्यासाठी गावात पोहोचले.परवानगी मिळताच त्याला शांत करण्याची तयारी सुरू होती,मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.वाघिणीचा मृत्यू कसा झाला हे जाणून घेण्यासाठी तिचा मृतदेह IVRI बरेली येथे पाठवण्यात येणार आहे वाघिणीच्या आगमनामुळे सुमारे 10 तास गावकरी घाबरले होते.












































































