‘प्रारूप जाहिरात’ असा उल्लेख असलेला आदेश समाज माध्यमांमध्ये व्हायरल
अधोरेखित ऑनलाइन डेस्क । राज्यात तब्बल 4 हजार 625 जागांची तलाठी पदासाठी लवकरच भरती केली जाणार आहे.याबाबत महसूल व वन विभागाच्या नावाने ‘प्रारूप जाहिरात’ असा उल्लेख असलेला आदेश आज दिवसभर समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाला आहे.पण,शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर मात्र हा आदेश अद्याप दिसत नाही.17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर दरम्यान ही भरती होणार असल्याचे या आदेशात म्हटले आहे.दरम्यान,तलाठी भरतीबाबत मार्गदर्शन करण्याकरिता विभागस्तरावर व जिल्हास्तरावर मदत कक्ष (हेल्प डेस्क) स्थापन करण्यात बाबत अपर जमाबंदी आयुक्त आणि अतिरिक्त संचालक,भूमी अभिलेख पुणे यांच्याकडून सूचना प्राप्त झाल्या आहेत.
समाज माध्यमांमध्ये व्हायरल झालेल्या ‘प्रारूप जाहिरात’ या आदेशात किती तारखेचा आदेश आहे हे नमूद करण्यात आलेले नाही.अर्ज भरण्याच्या तारखेचे व परीक्षा शुल्क भरण्याच्या तारखेचे रकाने रिक्त ठेवण्यात आलेले आहेत.त्यामुळे थोडीशी संभ्रमावस्था दिसत असली तरीही शासनाच्या वतीने तसेच संबंधित विभागाच्या मंत्र्यांकडून वेळोवेळी विविध कार्यक्रमांमधून राज्यातील भरती लवकरच होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.’प्रारूप जाहिरात’ असा उल्लेख असलेला हा आदेश शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर अद्याप दिसत नाही.
व्हायरल झालेल्या जाहिरातीत म्हटले आहे की,महसूल व वन विभागाच्या आदेश म्हटले आहे की,महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकूण 4 हजार 625 पदांच्या सरळसेवा भरती करता राज्यातील एकूण 36 जिल्ह्यात ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे.17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर दरम्यान ही परीक्षा होणार आहे.
व्हायरल झालेल्या जाहिरातीत म्हटले आहे की, विहित केलेल्या अटी व शर्तीची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून शासनाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच जाहिरातीची माहिती https://mahabhumi.gov.in/mahabhumilink या लिंकवर उपलब्ध आहे. तसेच सदर जाहिरात सर्व विभागीय आयुक्त व सर्व जिल्हाधिकारी यांच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. तसेच पदसंख्या आणि आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागांच्या सूचनेनुसार बदल (कमी-जास्त) होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पदसंख्या आणि आरक्षणामध्ये बदल झाल्यास याबाबतची घोषणा, सूचना वेळोवेळी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या सूचनांच्या आधारे प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या पदाकरीता भरती प्रक्रिया राबविण्यात येईल.
तलाठी पदभरतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात मदत कक्ष
सिंधुदुर्ग : जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या आस्थापनेवरील तलाठी पदभरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांच्या अडी अडचणी दूर करण्यासाठी आणि त्यांना मार्गदर्शन करण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयात मदत कक्ष (हेल्प डेस्क)स्थापन करण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागातील गट क संवर्गातील तलाठी पदभरतीच्या अनुषंगाने महसूल व वन विभाग यांच्याकडील पत्रानुसार तलाठी (गट-क) संवर्गाची सरळसेवा पदभरती प्रक्रिया राबवून संपूर्ण भरती प्रक्रीया पार पाडण्यासाठी शासन स्तरावरुन जाहिरात प्रसिध्दी देण्यात येणार असून,तलाठी पदभरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या अडी अडचणी दूर करण्यासाठी तसेच त्यांना मार्गदर्शन करण्याकरिता विभागस्तरावर व जिल्हास्तरावर मदत कक्ष (हेल्प डेस्क) स्थापन करण्यातबाबत अपर जमाबंदी आयुक्त आणि अतिरिक्त संचालक,भूमी अभिलेख पुणे यांच्याकडून सूचना प्राप्त झाल्या आहेत.
‘प्रारूप जाहिरात’ असा उल्लेख असलेला आदेश PDF मध्ये
जाहिरात डाउनलोड करा : ‘प्रारूप जाहिरात’
‘प्रारूप जाहिरात’ नुसार जागांची संख्या अशी
Sr No | जिल्याचे नाव | एकूण जागा | |
01 | पुणे | 383 | |
02 | सातारा | 153 | |
03 | सांगली | 98 | |
04 | सोलापूर | 197 | |
05 | कोल्हापूर | 56 | |
06 | नाशिक | 268 | |
07 | नंदुरबार | 54 | |
08 | जळगाव | 208 | |
09 | अहमदनगर | 250 | |
10 | ठाणे | 65 | |
11 | पालघर | 142 | |
12 | रायगड | 241 | |
13 | रत्नागिरी | 185 | |
14 | सिंधुदुर्ग | 143 | |
15 | मुंबई शहर | 19 | |
16 | मुंबई उपनगर | 43 | |
17 | अमरावती | 56 | |
18 | अकोला | 41 | |
19 | यवतमाळ | 123 | |
20 | वाशीम | 19 | |
21 | बुलढाणा | 49 | |
22 | औरंगाबाद | 161 | |
23 | जालना | 95 | |
24 | परभणी | 84 | |
25 | हिंगोली | 68 | |
26 | नांदेड | 119 | |
27 | बीड | 164 | |
28 | लातूर | 50 | |
29 | उस्मानाबाद | 110 | |
30 | नागपूर | 177 | |
31 | वर्धा | 78 | |
32 | भंडारा | 67 | |
33 | गोंदिया | 60 | |
34 | चंद्रपूर | 167 | |
35 | गडचिरोली | 158 | |
36 | धुले | 205 |