Last Updated on 31 May 2023 11:10 PM by Sanjay Patil/Adhorekhit
एक लाख रुपयांचा धनादेश देऊन अश्रू पुसण्याचा प्रयत्न. : 27 मेंढ्या ठार झालेल्या मेंढपाळांचा केला सन्मान !
अधोरेखित ऑनलाइन डेस्क । नवी मुंबईचे निवृत्त मुख्य अभियंता शहाजी सवदे व त्यांच्या मित्र परिवाराने पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या जयंतीचे औचित्य साधून नागठाणे येथे रानावनात भटकणाऱ्या मेंढपाळ बांधवांच्या कळपात जाऊन जयंती साजरी केली
गेल्या काही दिवसापूर्वी पलूस तालुक्यातील नागठाणे येथे बिबट्याच्या हल्ल्यात कागल येथील मेंढपाळाच्या 27 मेंढ्या मृत्यूमुखी पडल्या होत्या.मेंढपाळ कुटुंबावर आलेल्या दुखाच्या डोंगरावर मात करण्यासाठी मेंढपाळ बांधवांना हातभार लावण्यासाठी आज त्यांच्या मेंढपाळ वाड्यावर जाऊन त्यांना धीर आणि आधार देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
यावेळी नवी मुंबईचे निवृत्त मुख्य अभियंता शहाजी सवदे,सौ रेखा सवदे,समाजसेवक बजरंग गावडे,नामदेव जी मदने सर,प्रो.अजित येडगे,डॉ अमोल हिरवे, डॉ.सुमित गावडे,विद्या तामखडे आणि सहकारी मिळून मेंढपाळ वाड्यावर जात आज राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती विधायक रीतीने साजरा करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी समाजातील दानशूर व्यक्ती शहाजी सवदे आणि आणि मुंबईची टीम यांनी एक लाख रुपये देऊन मेंढपाळांचा सन्मान केला
यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांच्याशी प्रो.अजित येडगे यांनी संपर्क करून दिल्यानंतर आ.पडळकर यांनी मेंढपाळांना धीर देऊन मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.तसेच सवदे आणि मुंबई च्या टीमचे अभिनंदन करून कौतुक केले आणि शासकीय स्तरावर पाठपुरावा करून लवकरच त्यांना शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.








































































