सांगली । येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथील कै.रंगराव आबा पाटील यांचे नातू व बाबासो रंगराव पाटील यांचे पुतणे व रामचंद्र रंगराव पाटील यांचे चिरंजीव चि. जयदिप व जखिणवाडी (ता. कराड) येथील कै.दत्तू चंदू पाटील यांची नात व मोहन दत्तू पाटील यांची पुतणी व बाळासो दत्तू पाटील यांची सुकन्या चि.सौ.कां. प्रियांका यांचा शुभविवाह रविवार दि. 21 मे 2023 रोजी दुपारी 12 वा 40 मी. या शुभ मुहूर्तावर क्रांतीसिंह नाना पाटील स्मारक येडेमच्छिंद्र या ठिकाणी संपन्न होणार आहे.
सदर विवाह सोहळ्याचे आनंदराव आबा पाटील,तुकाराम आबा पाटील,बाबासो रंगराव पाटील हे स्वागतोत्सुक आहेत.तरी या विवाह सोहळ्यास सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून वधूवरांना शुभ आशीर्वाद द्यावेत,अशी विनंती प्रेषक हणमंत रंगराव पाटील,रामचंद्र रंगराव पाटील,लक्ष्मण आनंदराव पाटील,विजय वसंत पाटील,शशिकांत संभाजी पाटील,दिलीप आनंदराव पाटील,संजय तुकाराम पाटील,संजय वसंत पाटील,विजय संभाजी पाटील यांनी केली आहे.घाईगडबडीत अथवा नजरचुकीने निमंत्रण पत्रिका देण्याचे राहून गेले असेल तर हेच निमंत्रण समजून शुभ विवाहास उपस्थित रहावे,असे पाटील परिवार यांच्यावतीने आग्रहाचे निमंत्रण आहे.
हेही वाचा…