Last Updated on 14 May 2023 6:25 PM by Sanjay Patil/Adhorekhit
दिल्ली | कर्नाटकचे पोलीस महासंचालक प्रवीण सूद यांची केंद्रीय अन्वेशन विभागाच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.प्रवीण सूद यांची दोन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे.सीबीआयचे प्रमुख सुबोध कुमार जयस्वाल यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर सूद 25 मे रोजी पदभार स्वीकारतील. डीजीपी सूद हे 1986 च्या बॅचचे कर्नाटक केडरचे आयपीएस अधिकारी आहेत.
सीबीआयचे विद्यमान संचालक सुबोध कुमार जयस्वाल यांचा कार्यकाळ २५ मे रोजी संपणार आहे.त्यामुळे त्यांच्या जागी नव्या संचालकाची निवड करण्याकरता उच्च स्तरीय समितीची स्थापना करण्यात आली होती.यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरन्यायाधीश चंद्रचूड आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांचा समावेश होता.या समितीद्वारे दोन वर्षांच्या निश्चित कार्यकाळासाठी अधिकाऱ्याची निवड केली जाते.त्यामध्ये सीबीआयच्या संचालकपदासाठी 3 वरिष्ट आयपीएस अधिकार्यांच्या नावांवर विचार करण्यात आला. त्यामध्ये अखेर प्रवीण सूद यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. सूद हे सन 1986 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.









































































