Last Updated on 29 Apr 2023 4:51 PM by Sanjay Patil/Adhorekhit
आंध्र प्रदेशातील घटना : शिक्षण क्षेत्र हादरले
Exam Results : आंध्र प्रदेशात नऊ शालेय विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.आंध्र प्रदेश बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर 48 तासांत शाळकरी मुलींच्या आत्महत्येच्या या घटना समोर आल्या आहेत.अशा परिस्थितीत परीक्षेत नापास होण्याच्या भीतीने शालेय विद्यार्थ्यांनी हे जीवघेणे पाऊल उचलल्याचे चित्र आहे.याव्यतिरिक्त आणखी दोन विद्यार्थ्यांनीही आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. सध्या दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आंध्र प्रदेश बोर्ड ऑफ इंटरमीडिएट परीक्षेचा 11 वी आणि 12 वीचा निकाल बुधवारी जाहीर झाला.या वर्षी सुमारे 10 लाख विद्यार्थी आंध्र प्रदेश बोर्डाच्या परीक्षेत बसले होते.आणि इयत्ता 11 वीच्या विद्यार्थ्यांची उत्तीर्णतेची टक्केवारी 61 टक्के होती,तर 12 वीच्या विद्यार्थ्यांची उत्तीर्णतेची टक्केवारी 72 टक्के होती.
या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली
मीडिया रिपोर्ट्सनुसार,इंटरजिएटच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या 18 वर्षीय विद्यार्थी एका विषयात नापास झाला.त्यामुळे त्याने विशाखापट्टणमच्या कांचरापलेम येथे त्याच्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली.आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील दोन 17 वर्षीय विद्यार्थ्यांनी एपी इंटरमीडिएट परीक्षेत नापास झाल्याने जीवन संपवले संपवले.
एका विद्यार्थिनीने तलावात उडी घेऊन आत्महत्या केली,तर एका मुलाने कीटकनाशक प्राशन करत आत्महत्या केली.अनकापल्ली येथे राहणारी 17 वर्षी मुलगी इंटरमिजिएटच्या पहिल्या वर्षांत कमी गुण मिळाल्याने आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे.आणखी दोन विद्यार्थ्यांनीही आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरु आहेत.











































































