Last Updated on 27 Mar 2023 8:48 PM by Sanjay Patil/Adhorekhit
पुणे । पुणे येथील खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक प्रताप मानकर यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह पदक देवून गौरविण्यात आले.
पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य संजय कुमार यांच्या हस्ते पोलीस संशोधन केंद्र (सीपीआर) पुणे येथे पदक देवून गौरविण्यात आले.यावेळी पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार,सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक,अपर पोलीस आयुक्त डॉ.जालिंधर सुपेकर,पोलिस अधीक्षक पोलिस संशोधन केंद्र ज्योती क्षीरसागर उपस्थित होते.
यावेळी पोलीस आयुक्त पुणे शहर रितेश कुमार आणि अपर पोलीस आयुक्त डॉ.जालिंधर सुपेकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी २८ पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह -२०२० (पदक) आणि १५ पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना गडचिरोली येथे नक्षलग्रस्त भागात उत्कृष्ट सेवा बजावल्याबद्दल विशेष सेवा पदक -२०२२ ने गौरविण्यात आले.












































































