सांगली । राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष,माजी मंत्री आ.जयंत पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कासेगाव (ता.वाळवा) येथे आयोजित केलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील भव्य व देखण्या बैलगाड्या शर्यतीच्या मैदानात दामोदर निकम शेरे यांच्या बैलगाडीने मानाचा ‘जयंत केसरी’ किताब पटकाविला.माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांच्या हस्ते रुपये १ लाख ६ हजार २६५ व कायम शिल्ड देवून त्यांचा सन्मान करण्यात आला.युवा नेते,ग्रामपंचायत सदस्य अतुल लाहिगडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी या मैदानाचे सुंदर आयोजन केले.प्रचंड गर्दी व अमाप उत्साहात पार पडलेल्या या शर्यतीने कृष्णा नदी रोडला अक्षरशः यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.
या स्पर्धेत जीवन ड्रायव्हर निनाम,अमोल माने नरसिंहपूर यांच्या बैलगाडीने दुसरा,शौर्य दैवत गोवेकर लोणंद यांच्या बैलगाडीने तिसरा,जीवन ड्रायव्हर निनाम (ब) यांच्या बैलगाडीने चौथा,जयवंत यादव गोवारे यांच्या बैलगाडीने पाचवा,तर गोधन ग्रुप काले यांच्या बैलगाडीने सहावा क्रमांक पटकाविला आहे. सर्व विजेत्यांना आ.जयंतराव पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी आ.मानसिंगभाऊ नाईक,माजी जि.प.अध्यक्ष देवराज पाटील,माजी नगरसेवक खंडेराव जाधव,दीपक पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.युवा नेते अतुल लाहिगडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील एक भव्य शर्यती घेतल्याबद्दल आ.पाटील,आ.नाईक यांनी त्यांचे अभिनंदन केले. तर अतुलभाऊ लाहिगडे यांनी पुढील वर्षी राज्यव्यापी स्पर्धा घेण्याचा मनोदय व्यक्त केला.
कै.शरद लाहिगडे मित्र परिवार व कासेगाव बैल गाडी संघटनेच्या वतीने आयोजित मैदानाचे युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शरद लाड,माजी जि.प.सदस्य रणधीर नाईक यांच्या हस्ते सकाळी ११ वा. पूजन करून स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला.या स्पर्धेत सांगली,सातारा, माळशिरस,चिपळूण,कोल्हापूर,नाशिक,मुंबई आदी भागातील २२६ बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या. एक आदत,एक बैल असे स्पर्धेचे स्वरूप होते. पंच म्हणून दिलीप पाटील,पोपट माने,रामभाऊ पाटील,काका पाटील,दिग्विजय सावंत यांनी जबाबदारी पहिली. किरण भिसे रिसवड,रणजित बनसोडे बांबवडे,विकास जगदाळे कुमठे, प्रसाद कुलकर्णी राजारामनगर यांनी स्पर्धेचे प्रभावी समालोचन करून स्पर्धेत रंगत आणली.
बंडासो देशमुख,विकास लाहिगडे,मकरंद माने,विक्रम गावडे,विकास पाटील (भैय्या), सुशांत माने(पांडा),सागर कांबळे,अभिषेक दंडवते,सोमनाथ लाहिगडे,अनिकेत लाहिगडे, सुरज देशमुख,गणराज देशमुख,विनोद लाहिगडे,शरद शिनगारे,विनोद लाहिगडे, अर्शद मुल्ला,संभाजी पाटील,अक्षय लाहिगडे, उत्तम गेजगे यांच्या सह युवा कार्यकर्त्यांनी स्पर्धेचे उत्कृष्ठ नियोजन करण्यासाठी अतिशय परिश्रम घेतले.
आ.पाटील यांनी केले बैलगाडीचे सारथ्य
आ.पाटील यांचे स्पर्धेच्या ठिकाणी आगमन होताच कृष्णा नदी रोडपासून व्यासपिठापर्यंत त्यांना सजविलेल्या बैलगाडीतून हालगी-घुमके आणि तुतारीच्या निनादत नेण्यात आले. आ.पाटील हे गेल्या चाळीस वर्षापासून राजकारणात उत्तम सारथ्य करीत असून तितक्याच लिलया त्यांनी बैलगाडीचेही सारथ्य केले. यावेळी त्यांचे समवेत आ.मानसिंग नाईक,देवराज पाटील, खंडेराव जाधव,अतुलभाऊ लाहिगडे होते. उपस्थित बैलगाड्या प्रेमींनी टाळ्या आणि शिट्यांनी त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.