Last Updated on 22 Feb 2023 2:47 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । ग्रामीण भागात आजही शोषण व्यवस्था जीवंत आहे ती माणसाचं पद्धतशीरपणे वस्तूकरण करते आहे असे प्रतिपादन प्रसिद्ध कवी सुरेश मोहिते (बहे)यांनी केले.
काव्यानंद ग्रुप,मंत्रालय मुंबई आयोजित ‘ कविता रानातली…. मनातली ‘ या काव्यवाचन कार्यक्रमात कवी मोहिते हे बोलत होते.
ते पुढे म्हणाले,अलीकडे घरातच भाषिक संस्काराचा अभाव दिसून येतो,प्रमाण मराठीपेक्षा बोलीभाषा जास्त समृध्द आणि संस्कारक्षम आहे तिला मागास समजून आपल्यातून हद्दपार केले.
यावेळी ग्रामीण जगण्यातील समृध्द अनुभव लोकभाषेत सादर करताना त्यांच्या कवितेला विशेष धार आली होती.त्यांनी सादर केलेल्या ‘कोयता’, इनामदार’ ,’बारा जूनच्या आदल्या रात्री’ आणि काही विडंबन कवितांनी रसिकांची मने जिंकली.
यावेळी मंत्रालयातील काही निवडक कवींनीही आपल्या कविता सादर केल्या.यामध्ये स्वाती महांगरे, कनिका,दिवाकर मुळे,अतुल कुलकर्णी,लीना मॅडम,श्वेता सूर्यवंशी,प्रवीण मुंढे,ज्येष्ठ कवी सतीश मोघे आणि सतीश जोंधळे-पाटील यांचा समावेश होता.या कार्यक्रमाला सदानंद पुडपाळ,श्रीकांत भोसले, प्राचार्य दिलीपकुमार कांबळे,पत्रकार अनंत धनसरे,कवी गोविंद पाटील तसेच रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सतीश जोंधळे-पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.









































































