टोमॅटो सूप जेवणाअगोदर स्टार्टर म्हणून दिले जाते.आजारी व्यक्ती किंवा थकवा जाणवत असलेल्या व्यक्ती साठी सुध्या सूप खूप गुणकारी आहे.रेस्टॉरंटचे सूप प्यायला आवडत असेल तर घरीच टोमॅटो सूप बनवा.पाहा ही सोपी रेसिपी.
आजकाल बाजारात सर्व काही उपलब्ध आहे.पॅकेटमध्ये उपलब्ध असलेले पदार्थ चुटकीचरशी रेडी होतात.पण यामध्ये आढळणारे हानिकारक घटक तुमच्या आरोग्यावर परिणाम करू शकतात. अशा परिस्थितीत तुम्ही घरच्या घरी चविष्ट रेसिपी बनवून त्यांना खाऊ घालू शकता.पॅकेटमध्ये मिळणारे सूप मुलांना खूप आवडते.जर तुम्हाला हेल्दी सूप मुलांना खायला द्यायचे असेल तर तुम्ही या रेसिपीने ते लवकर तयार करू शकता.टोमॅटो सूप बनवायला खूप कमी वेळ लागतो. चला तर मग जाणून घेऊया कसा बनवायचा टेस्टी आणि हेल्दी टोमॅटो सूप.
टोमॅटो सूप बनवण्यासाठी साहित्य
3-4 टोमॅटो
1 टीस्पून बटर
3-4 लसूण पाकळ्या
1 इंच आल्याचा तुकडा
काळी मिरी
मीठ चवीनुसार
सजवण्यासाठी ब्रेड
टोमॅटो सूप बनवण्याची पद्धत
तुम्हाला हवे असेल तर तुम्ही टोमॅटो सोबत गाजर किंवा पालक सारख्या भाज्या सुद्धा घालू शकता. हे तितकेच टेस्टी होईल. तसेच ते लहान मुलांबरोबरच मोठ्यांनाही आवडेल. सूप बनवण्यासाठी प्रथम टोमॅटोचे चार तुकडे करा. लसूण पाकळ्या आणि आल्याचे तुकडे एकत्र सोलून धुवा. आता एका पॅनमध्ये एक चमचा किंवा दोन चमचे बटर घाला. टोमॅटो सोबत लसूण, आले सोबत टोमॅटोचे तुकडे टाका. झाकण ठेवून हे टोमॅटो मंद आचेवर शिजू द्या. ते शिजल्यावर तळाला चिकटून मंद सुवास येऊ लागेल. गॅस बंद करून थोडा वेळ झाकून ठेवा आणि टोमॅटो पूर्णपणे शिजू द्या.
टोमॅटो सूप तयार करण्याची कृती
आता टोमॅटोची साल काढून मिक्सर जारमध्ये टाका. सोबत लसणाच्या कळ्या आणि आल्याचे तुकडे टाका. जर तुम्हाला गाजर, पालक अशा इतर काही भाज्या घालायच्या असतील तर त्याही उकळा. आता सर्व गोष्टी मिक्सरमध्ये टाकून बारीक करा. जर पेस्ट घट्ट वाटत असेल तर थोडे पाणी घाला. गाळणीच्या साहाय्याने या जाडसर पेस्टला गाळून घ्या. तुम्हाला एकदम स्मूद सूप मिळेल. त्यात थोडी साखर घाला. त्यासोबत मीठ आणि मिरपूड घालून चांगले मिक्स करा.
गार्निशिंगसाठी ब्रेड
ब्रेडचे क्रॉउटन्स बनवण्यासाठी ब्रेडचे छोटे तुकडे करून तेलात तळून घ्या. यासाठी तुम्ही शिळी ब्रेड निवडा. जेणेकरून क्रॉउटन्स क्रिस्पी होतात. याने सूपवर सजवा आणि गरमा गरम सर्व्ह करा.