Last Updated on 11 Feb 2023 8:11 PM by Sanjay Patil/Adhorekhit
राजारामबापू कारखाना कार्यस्थळावर जय्यत तयारी
लोकांशी थेट संवाद साधत अगदी साधेपणाने शुभेच्छा स्विकारणार
सांगली ।
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष,माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांचा ६१ वा वाढदिवस गुरुवार दि.१६ फेब्रुवारी असून ते कारखाना कार्यस्थळावर हार-तुऱ्यांना फाटा देत लोकांशी थेट संवाद साधत अगदी साधेपणाने शुभेच्छा स्विकारणार आहेत.त्यामुळे आपण कोणीही शुभेच्छा देण्यास येताना हार-तुरे आणू नयेत आणि शिस्त पाळावी,असे आवाहन राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी. आर.पाटील,राजारामबापू सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले.
प्रा.शामराव पाटील म्हणाले,आ.पाटील हे सकाळी साडे नऊ ते दुपारी साडे चारपर्यंत राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर शुभेच्छा स्विकारण्या स थांबणार आहेत. त्यासाठी स्व.बापूंच्या पुतळा परिसरात वेग-वेगळे मंडप उभारले जाणार आहेत. यामध्ये तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघातील गावांना वेग- वेगळी वेळ दिली जाणार आहे. तसेच महिला, तालुक्याबाहेरील आणि जिल्ह्याबाहेरील कार्यकर्त्यांच्या बसण्याचीही स्वतंत्र मंडप व्यवस्था केलेली आहे. आ. जयंतराव पाटील हे प्रत्येक मंडपात जाऊन मान्यवर,कार्यकर्ते व ग्रामस्थांशी संवाद साधत आपल्या वाढदिवसा च्या शुभेच्छा स्विकारणार आहेत. यावेळी सर्वांच्या अल्पोहाराची व्यवस्था केलेली आहे.
पी.आर.पाटील म्हणाले,आ.जयंतराव पाटील यांनी कधीही आपला वाढदिवस सार्वत्रिकपणे साजरा केलेला नाही. मात्र आम्हा कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर त्यांनी दोन वेळा वाढदिवसाच्या शुभेच्छा स्विकारण्यास वेळ दिला आहे. हा त्यांचा ६१ वा वाढदिवस असून आम्ही त्यांच्याशी चर्चा करून हा वाढदिवस साधेपणाने मात्र मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.आ.पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त इस्लामपूर,आष्टा शहरासह संपूर्ण तालुक्यात विविध विधायक उपक्रम व क्रीडा स्पर्धांचे आयोजन केलेले आहे.जयंत प्रिमियर कबड्डी लिग,फुटबॉल स्पर्धा,धावण्याची स्पर्धा, एकांकिका स्पर्धा,सुगम गायन स्पर्धा अशा कितीतरी स्पर्धा व उपक्रमांचे विविध संस्था व संघटनांनी आयोजन केलेले आहे. कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे त्यांचा वाढदिवस साजरा करीत आहेत.
यावेळी राजारामबापू सहकारी दूध संघाचे अध्यक्ष नेताजीराव पाटील,माजी अध्यक्ष विनायक पाटील,उपाध्यक्ष शशिकांत पाटील,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील,जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, प्राचार्य आर.डी.सावंत, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष संजय पाटील,सत्यविजय बँकेचे अध्यक्ष प्रकाश पवार,युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संग्राम जाधव,सचिनकाका पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.












































































