सांगली ।
इस्लामपूर येथील प्रथमेश प्रभाकर जंगम यांना वेदांग ज्योतिष व वास्तुशास्त्र अभ्यास केंद्र,ज्योतिष प्रबोधिनी,कराड अंतर्गत घेण्यात आलेल्या वैदिक वास्तुशास्त्र या विषयात वास्तु विशारद ही पदवी देऊन गौरविण्यात आले.
यासाठी त्यांना पुरुषोत्तम उर्फ सचिन बेहरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
इस्लामपूरचे सुप्रसिद्ध ज्योतिषी-ज्योतिष शास्त्री व वास्तु पदविका प्राप्त प्रभाकर जंगम यांचे ते चिरंजीव आहेत.