श्रावण महिन्यात भक्तगण भगवान शिवला प्रसन्न करण्याची एक संधी सोडत नाहीत. या महिन्यात संपूर्ण विधीवत पुजा केल्याने भगवान शंकर भक्तांची प्रत्येक इच्छा पूर्ण करतात. शिव पुराणानुसार भगवान शंकराला त्याग, तपस्या, वात्सल्य तसेच करुणेची मूर्ती असल्याचे सांगितले जाते. भगवान शंकराला प्रसन्न करणे अतिशय सोपे असते.
यासाठी शिवपुराणात अनेक अशा गोष्टी सांगितल्या आहेत. ज्याचे दान केल्याने मनुष्याची प्रत्येक मनोकामना पूर्ण होते. दान दिल्याने जीवनातील अनेक कष्ट दूर होतात. तसेच आयुष्यात भरभराट होईल. दान केल्याने ग्रह पीडेपासून मुक्ती मिळते. शिवपुराणानुसार विविध समस्या दूर करण्यासाठी वेगवेगळ्या वस्तूंचे दान केले पाहिजे. चुकीचे पदार्थ दान केल्याने जीवनात समस्या वाढू शकतात. जाणून घ्या भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी आणि जीवनातील दु:ख दूर करण्यासाठी कोणत्या गोष्टींचे दान केल्याने लाभ होतो.
शिवपुराणानुसार या वस्तूचे करा दान, दु:ख आणि आजारांपासून होईल सुटका
- मीठ – घराच्या सुख-समृद्धीसाठी आणि वाईट काळ दूर करण्यासाठी मिठाचे दान करा.
- तीळ – आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि समस्या दूर करण्यासाठी तिळाचे दान करा. यामुळे मृत्यूची भीतीही दूर होते.
- तूप – जे लोक सातत्याने आजारी पडत आहे अथवा ज्यांना शारिरीक व्याधींनी ग्रसत आहेत त्यांनी तुपाचे दान केले पाहिजे.
- कपडे – शिवपुराणानुसार नव्या अथवा जुन्या कपड्यांचे दान केल्याने वय वाढते आणि तुम्ही निरोगीही राहता.
- धान्य – जर तुम्हाला वाटत असेल की घरात कधीही खाण्याची कमतरता होऊ नये यासाठी धान्याचे दान जरूर करा.
- गूळ – गुळाचे दान केल्याने नेहमी शुद्ध आणि आवडीचे भोजन प्राप्त होते.
काय आहे शिव पुराण
शिवपुराणा शिव-महिमा विस्ताराने सांगण्यात आला आहे. शिव पुराणात शंकराच्या जीवनावर प्रकाश टाकताना त्यांच्या जीवनपद्धती, विवाह आणि त्यांच्या पुत्रांची उत्पत्ती याबद्दल सांगण्यात आले आहे.
श्रावणात शिव मूठ वाहण्याला खूप महत्त्व आहे. या महिन्यात दर सोमवारी शिवमूठ अर्पण केल्याने अनेक लाभ होतात. श्रावणात शिवलिंगावर अभिषेक केला जातो हे सगळ्यांनाच माहीत आहे. मात्र त्याचप्रमाणे अभिषेकाबरोबर शिवाला शिव मूठही वाहिली जाते. श्रावणात ‘शिव मूठ’ला विशेष महत्व आहे.
- श्रावणी सोमवारी ‘शिव मूठ’ चढवल्यानं अनेक कष्टातून आपली मुक्तता होते. तर मग पाहुयात ‘शिव मूठ’चे महत्व…
- श्रावणाच्या पहिल्या सोमवारी तांदळाची ‘शिव मूठ’ अर्पण करावी. आपल्या मुठीत तांदूळ घेऊन ते शंकराच्या पिंडीवर वहावेत.
- श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारी महादेवाला पांढऱ्या तिळाची ‘शिव मूठ’ अर्पण करावी. आपल्या मुठीत पांढरे तीळ घेऊन ते शंकराच्या पिंडीवर वहावे.
- श्रावणाच्या तिसऱ्या सोमवारी अख्खे मूग महादेवाला वहावे. ते ही नेहमीप्रमाणे आपल्या मुठीत मावतील एवढे मूग घेऊन ते शंकराच्या पिंडीवर वहावे.
- श्रावणाच्या चौथ्या सोमवारी जव महादेवाला वहावे. ते ही नेहमीप्रमाणे आपल्या मुठीत जव घेऊन ते शंकराच्या पिंडीवर वहावे.