पुणे | मांजरप्रेमींनो…घरात मांजर पाळायचे असेल तर हे वृत्त वाचाच.पुण्यात मांजर पाळण्यासाठी आता महानगरपालिकेची परवानगी घ्यावी लागणार आहे.आरोग्य विभागाच्या या प्रस्तावास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.
कुत्र्यासोबत आता मांजर पाळणाऱ्यांची संख्याही मोठी असल्याने महापालिकेने मांजर पाळण्यासाठी परवाना घेण्याचा नियम केला आहे. त्यासाठी अर्ज भरून मांजराचे तीन फोटो आणि 50 रूपये शुल्क अर्जासोबत महापालिकेला द्यावा लागणार आहे. यासोबतच अँटीरेबीज लसीकरण प्रमाणपत्रही सादर करावं लागणार आहे. याबाबतचे आदेशच पुणे महापालिकेकडून देण्यात आले आहेत.
मांजराचं लायसन्स काढावं लागणार आहे.मांजर पाळण्यासाठी आता तुम्हाला अर्ज भरून मांजराचे तीन फोटो आणि 50 रूपये शुल्क अर्जासोबत महापालिकेला द्यावा लागणार आहे.इतकंच नाहीतर अँटीरेबीज लसीकरण प्रमाणपत्रही सादर करावं लागणार आहे.याबाबतचे आदेशच पुणे महापालिकेकडून देण्यात आले आहेत.त्यामुळे नागरिकांनी याची नोंद घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.