४० वर्षांवरील खेळाडूंच्या लक्षवेधी लढती; पेप्सी स्पोर्ट्सवर नऊ धावांनी विजय
सांगली । इस्लामपूर क्रिकेट असोसिएशनतर्फे सुरू असलेल्या ४० वर्षांवरील टेनिस बॉल क्रिकेट लिग स्पर्धेत जावडेकर स्पोर्टसने पेप्सी स्पोर्टस्वर ९ धावांनी विजय मिळवला.रोमहर्षक सामन्यात जावडेकरचा गोलंदाज रावसाहेब चव्हाण याने अवघ्या दोन धावा देत तीन बळी मिळवत संघाला विजेतेपद मिळवून दिले.विजेत्या संघाला राज्याचे महसूल विभागाचे सचिव अण्णासाहेब चव्हाण व जेष्ठ नागरिक रघुनाथ परीट यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.
उरण परिसरातील तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर स्पर्धा झाल्या.१९९० च्या दशकातील इस्लामपूर शहरातील दहा नामवंत संघानी आपले कौशल्य पणाला लावले. एम.डी. पवार स्पोर्टस्ने तिसरा, युनिटी स्पोर्टसने चौथा क्रमांक पटकावला.अंतिम सामन्यात जावडेकर स्पोर्टस्ने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली.सहा षटकात ५१ धावा केल्या.शशिकांत सूर्यवंशी (२०),सुनील शिंदे (१३) यांचे योगदान होते.पेप्सी स्पोर्टस्ला जावडेकर संघाने अवघ्या ४२ धावांमध्ये रोखले.अमोल पाटील याने (१५) धावा केल्या. जावडेकरचा खेळाडू विरेश देवळालकर याने अष्टपैलू खेळी केली.
उपांत्य लढतीमध्ये पोहचलेल्या पेप्सी व जावडेकर स्पोर्ट्सने प्रतिस्पर्धी संघांच्या विरोधातील सर्व सामन्यात विजय नोंदवले.सकाळच्या सत्रात झालेल्या उपांत्य लढतीमध्ये जावडेकर स्पोर्टस्ने एम.डी.पवार स्पोर्ट्सवर २६ धावांनी विजय मिळवला.नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना जावडेकर स्पोर्टस्ने ६६ धावा केल्या. सुनील शिंदे (२४), शशिकांत धावा केल्या. सूर्यवंशी (१९) तर वीरेश देवळालकर यांनी (१६) धावा केल्या.प्रतिस्पर्धी एम.डी.पवार संघाला अवघ्या ४१ धावा करता आल्या.त्यांच्या विलास नाईक याने सर्वाधिक (१३) धावा केल्या.या सामन्यात अष्टपैलू कामगिरी करताना वीरेश देवळालकर याने तीन विकेट मिळवल्या.तो सामनावीर ठरला.जहांगीर नरदेकर,मिलिंद कुंभार यांनी पंच म्हणून काम पाहिले.जावडेकर स्पोर्ट्सने साखळी फेरीत छत्रपती स्पोर्टस्,शॉर्ट अँड टॉल स्पोर्टस्,युनिटी व वाठारकर स्पोर्टस्,विरोधात विजय मिळवले.
दुपारच्या सत्रात झालेल्या पेप्सी पाहिले.सचिन जौंजाळ यांनी समालोचन केले. दुपारच्या दुसऱ्या सत्रात झालेल्या पेप्सी विरुद्ध युनिटी स्पोर्ट्सच्या उपांत्य लढतीत प्रथम फलंदाजी करताना सहा षटकात युनिटी संघाने ६१ धाव केल्या.पेप्सी संघाने शेवटचा चेंडू राखून विजयासाठी असणारे ६१ धावांचे आव्हान सहज पार केले. शेवटच्या क्षणापर्यंत सामन्यात रंगत आली. अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या पंडित कोडक याने २३ धावा केल्या. गोलंदाजी करताना २ विकेट मिळवल्या. तो सामनावीर ठरला. युनिटीतर्फे विशाल कडगावे (१३), मनोज ओसवाल (१४) तर पेप्सीचा खेळाडू अमोल पाटील यांनी (१६) धावा केल्या.त्याने गोलंदाजी करताना ३ विकेट मिळवल्या.या सामन्यात निवास पाटील व विकास मोटे यांनी काम पाहिले.
अंतिम फेरीत जाताना पेप्सी स्पोर्ट्सने साखळी फेरीत सनी स्पोर्टस् एम. डी. पवार स्पोर्टस्,महाडिक स्पोर्टस्,इंदिरा स्पोर्टस्, विरोधात विजय मिळवले.जयदीप जाधव, मनोज पवार,संजय भोईटे, विनोद शिंदे,निवास पाटील,सुनील गुरव,राजू मुंडे,रणजित परदेशी,हणमंत परीट, दत्ता परीट,विलास नाईक यांनी सामने यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.अंतिम सामन्यात सामनावीर रावसाहेब चव्हाण,मालिकावीर विरेश देवळालकर,विलास नाईक (गोलंदाज),अमोल पाटील (क्षेत्ररक्षक),सुनील शिंदे (झेल),शशिकांत सूर्यवंशी (विकेट किपर) यांना गौरविण्यात आले.दत्ता पाटील,जयदीप जाधव, मनोज पवार पंच म्हणून काम पाहिले.गुणलेखक म्हणून धनंजय भोसले,जयदीप जाधव,निवास पाटील यांनी काम पहिले. सचिन जौंजाळ यांनी समालोचन केले.
आजी-माजी खेळाडूंचा सन्मान
स्पर्धेचे उद्घाटन मुख्याधिकारी वैभव सावळे व पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या हस्ते व जेष्ठ खेळाडू व पत्रकारांच्या उपस्थितीत झाले.अंतिम सामन्यानंतर इस्लामपूर शहरातील क्रिकेटचे राष्ट्रीय खेळाडू,आजी-माजी खेळाडू व स्पर्धेतील सहभागी खेळाडूंचा सन्मान स्मृतिचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.यावेळी माजी नगरसेवक विश्वास डांगे,संजय पाटील उपस्थित होते.