Last Updated on 03 Nov 2022 11:08 PM by Sanjay Patil/Adhorekhit
![]()
सोशल मीडियावर ‘मिम्स’ चा पाऊस; नेटकऱ्यांकडूनही प्रतिसाद
![]()
सांगली । पेठ-सांगली रस्ता सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे.सोशल मीडियावर अनेक ‘मिम्स’ सध्या तुफान ‘व्हायरल’ होत आहेत.तर,या रस्त्यासाठी गाडी नवीन आली आहे तरी बुकिंग सुरू आहे त्वरा करा अशीही खिल्ली उडवली जात आहे.
पेठ-सांगली रस्त्यावर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे या रस्त्यांवर वाहन चालवणे म्हणजे चालकांसाठी कसरतीचा विषय ठरला आहे.रस्त्याच्या अशा दुरवस्थेमुळे या रस्त्यावर कित्येक अपघात होऊन अनेकांचे बळी गेले आहेत,शिवाय अनेकजण जायबंदी झाले आहेत.वारंवार दुरुस्ती होऊन सुद्धा पुन्हा ये रे माझ्या मागल्या’ अशीच अवस्था आहे.कित्येक वर्षे ही स्थिती राहिल्याने आता हा रस्ता सोशल मीडियावर चांगलाच ‘ट्रोल’ होताना दिसत आहे.त्यानंतर अनेक ‘मिम्स’ देखील या रस्त्यावर रचले गेले.नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर ‘मिम्स’ चा अक्षरशः पाऊस पडला आहे.त्यातच या रस्त्यासाठी खास गाड्या बनविण्यात आल्याचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
![]()
सांगली ते पेठनाका गाडी नवीन आली आहे तरी बुकिंग सुरू आहे त्वरा करा…
खास..सांगली ते पेठनाका प्रवासाकरिता बनवलेल्या मोटारीचे प्रात्यक्षिक…
![]()









































































