Last Updated on 05 Nov 2023 9:40 PM by Sanjay Patil/Adhorekhit
🌑 जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आदेश
🌑 ग्रामपंचायतींच्या मुदती जस-जशा संपतील तसतसे ग्रामपंचायतींवर प्रशासक
🌑 निवडणूका होईपर्यंत आता काही काळासाठी प्रशासकराज
🌑 काही ग्रामपंचायतींवर 15 दिवसांसाठी,काही ग्रामपंचायतींवर 1 महिन्यासाठी प्रशासकराज
🌑 निवडणूका कोणत्याहीक्षणी जाहीर होण्याची शक्यता : प्रशासकराज औटघटकेचा
सांगली | ऑक्टोंबर ते डिसेंबर 2022 मध्ये मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील 452 ग्रामपंचायतीवर प्रशासकांच्या नियुक्तीचे आदेश सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिले आहेत.यामध्ये वाळवा तालुक्यातील ग्रामपंचायतींचाही समावेश आहे.निवडणूका होईपर्यंत आता ग्रामपंचायतींवर काही काळासाठी प्रशासक राज येणार आहे.दरम्यान,ग्रामपंचायत निवडणूका कोणत्याहीक्षणी जाहीर होण्याची शक्यता असल्याने प्रशासकराज औटघटकेचा ठरण्याची शक्यता आहे.
सांगली जिल्हयातील ऑक्टोंबर 2022 ते डिसेंबर 2022 मध्ये मुदत संपणाऱ्या 452 ग्रामपंचायतीवर निवडणूका होईपर्यंत प्रशासक नेमण्याबाबत कळविणेत आलेले आहे.त्यानुसार वाळवा तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींचा प्रशासकीयदृष्टया कारभार सुरळीत चालण्यासाठी प्रशासकांची नियुक्ती करण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे.
आदेशात म्हटले आहे की, मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या दिनांकापासून पुढील आदेश होईपर्यंत स्विकारण्याचा आहे. मुदत संपणाऱ्या तारखेची खात्री संबंधित ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी यांचेकडून करुन घेवूनच पदभार स्विकारावा.प्रशासक पदावर नेमणुक झालेल्या व्यक्तीस महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 मधील तरतुदीनुसार सरपंच पदाची अधिकार व कर्तव्ये प्राप्त होतील.ज्या व्यक्तीची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात येईल अशा व्यक्तीकडून आपली कर्तव्ये पार पाडताना झालेल्या गैरवर्तणूकीबद्दल किंवा कोणत्याही लांच्छनास्पद वर्तणूकीबद्दल अथवा कर्तव्यात दुर्लक्ष केल्याबाबत सदर व्यक्तीस पदावरून दूर करण्याबाबतचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आहेत.
दरम्यान,ग्रामपंचायत निवडणुकांसाठीच्या अंतिम मतदारयाद्या नुकत्याच (दि. 21 ऑक्टोबरला) जाहीर झाल्या आहेत.त्यामुळे ग्रामपंचायत निवडणूका कोणत्याहीक्षणी जाहीर होण्याची शक्यता असल्याने प्रशासकराज औटघटकेचा ठरणार आहे.काही ग्रामपंचायतींवर 15 दिवसांसाठी,काही ग्रामपंचायतींवर 1 महिन्यासाठी प्रशासकराज असणार असणार आहे.तर काही अपवादात्मक परिस्थितीत निवडणुका लांबल्यास हा कालावधी वाढू शकतो.
वाळवा तालुक्यात नियुक्त प्रशासकांचे नांव व गावे अशी :
एस. एन. कोळी (विस्तार अधिकारी)-शिगांव,कोरेगांव,नागांव,बागणी,रोझावाडी,ढवळी,मिरजवाडी,मर्दवाडी,काकाचीवाडी,फाळकेवाडी,बावची
ए.एस. दाईंगडे (विस्तार अधिकारी) –
किल्ले मच्छिंद्रगड,बहे,गाताडवाडी,तुजारपुर,खरातवाडी,हुबालवाडी,बनेवाडी,फार्णेवाडी (बो),येडेमछिंद्र,दुधारी,रेठरेहरणाक्ष,नरसिंहपूर
व्ही.एच.उरुणकर (विस्तार अधिकारी) –
पेठ,नेर्ले,कापूसखेड,कासेगाव,येवलेवाडी,माणिकवाडी,चिकुर्डे,साखराळे,नायकलवाडी,कामेरी,महादेववाडी,
जांभूळवाडी
ए.ए. कोळी (विस्तार अधिकारी) –
वाळवा,जुनेखेड,नवेखेड,अहिरवाडी,शिरगाव,गौडवाडी,ढगेवाडी
पी.एस.मोरे – (सांख्यिकी अधिकारी)-
मरळनाथपूर,मालेवाडी,कुंडलवाडी,रेठरेधरण,सुरूल,वाघवाडी,इटकरे,करंजवडे,
एस.बी.आंबी (विस्तार अधिकारी) –
गोटखिंडी,येडेनिपाणी,बहादूरवाडी, फार्णेवाडी(शि.),भडकंबे,पोखर्णी,कणेगाव,पडवळवाडी
आर. व्ही. कुंभार (विस्तार अधिकारी) –
ताकारी,बिचूद,बोरगांव,बेरडमाची,भवानीनगर,कोळे,लवंडमाची,शेणे
एस. ए. पाटील (विस्तार अधिकारी) –
धोत्रेवाडी,ओझर्ड,घाबकवाडी,वाटेगांव,काळमवाडी,केदारवाडी,कुरळप,डोंगरवाडी
ए.बी. गायकवाड (विस्तार अधिकारी) –
शिवपुरी,ठाणापुढे,विठठलवाडी,वशी,ऐतवडे बुद्रुक,देवर्डे,येलूर,ऐतवडे खुर्द
सी. ए. माळी (विस्तार अधिकारी) –
भरतवाडी,जकराईवाडी,कार्वे,लाडेगांव,शेखरवाडी












































































