Last Updated on 25 Oct 2022 2:47 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । भारतासह जगभरातील अनेक देशांत मंगळवारी WhatsApp ची सेवा जवळपास दीड तास ठप्प झाली होती.यासंबंधीच्या वृत्तानुसार व्हॉट्सअॅपची सेवा दुपारी 12.30 च्या सुमारास विस्कळीत झाली.जवळपास दीड तासानंतर दुपारी 2 वाजून 6 मिनिटांनी ती पुन्हा पूर्ववत झाली.व्हॉट्सअॅप सुरू झाल्याने युजर्सनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
लोकप्रिय सोशल मीडिया अॅप व्हॉट्सअप अनेक भागात डाऊन झाल्याचे समोर आले होते.जगभरात व्हॉट्सअॅपचे 2 अब्जांहून अधिक वापरकर्ते आहेत.
दुपारी 12.30 वाजल्यापासून WhatsApp डाऊन झाले होते.याचालाखो युजर्सला अडचणींचा सामना करावा लागला.ऐन दिवाळी सणात व्हॉटअप डाऊन झाल्याने अनेक युजर्सला शुभेच्छा देण्यास व्यत्यय येत होता.
दररोज 100 अब्जाहून अधिक मेसेज
व्हॉट्सअॅप हा अनेकांच्या दैनंदिन आयुष्याचा एक भाग झाला आहे. जगभरात व्हॉट्सअॅपचे दोन अब्जहून अधिक युजर्स आहेत. व्हॉट्सअॅप ही जगभरात लोकप्रिय मेसेजिंग अॅप आहे. दररोज 100 अब्जाहून अधिक मेसेज व्हॉट्सअॅपवर पाठवले जातात. Android मोबाइलवर युजर्स प्रतिदिवस सरासरी 38 मिनिटे WhatsApp चा वापर करतात. भारतात सर्वाधिक WhatsApp चे युजर्स आहेत.भारतात 390.1 दशलक्ष युजर्स आहेत.
युझर्सकडून ‘या’ अॅपला पसंती
WhatsApp बंद झाल्यानंतर अनेक युझर्सला आता मेसेज कसे पाठवावे अशी चिंता होती. मात्र अनेक युझर्स आता मेसेज पाठवण्यासाठी टेलीग्रामचा वापर करत असल्याचे निदर्शनास आले होते.
जगभरात फेसबुकचे 2.85 अब्ज मासिक सक्रिय वापरकर्ते आहेत. तर व्हॉट्सअॅपचे 2 अब्ज, तर इंस्टाग्रामचे 1.38 अब्ज युजर्स आहेत.









































































