॥ॐ॥
आपणा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
दीपावली मुहू्र्त
वसुबारस-(अर्थात गोधनरुपी लक्ष्मीची पूजा)
शुक्रवार,दि. 21 ऑक्टोबर 2022
अश्विन कृष्ण एकादशी ( रमा एकादशी )
गाईवासराचे सायंकाळी पूजन करावे.
गुरुद्वादशी ,धनत्रयोदशी-धन्वंरी जयंती
शानिवार,दि. 22 ऑक्टोबर 2022
दीप पूजन
अपमृत्यू येऊ नये म्हणून, खालील मंत्रांनी यमाची प्रार्थना करून दीप पूजन करावे.
यम प्रार्थना मंत्र
मृत्यूंना पाशदंडाभ्यां कालेन: श्याम यासह ।
त्रयोश्यां दीपदानत् सूर्यज: प्रियतां मम॥
दीर्घायुषीआरोग्य लाभावे म्हणून धन्वंतरी पूजन केले जाते.
(टीप-आपल्या भागात धनत्रयोदशी 22 तारखेच्या दिवशी करावी )
धनत्रयोदशी खुलासा शेवटी वाचा
दीपावली,नरकचतुर्दशी, अभ्यंगस्नान
सोमवार,दि. 24 ऑक्टोबर 2022
दीपावली,नरकचतुर्दशी, अभ्यंगस्नान -चंद्रोदय अभ्यंग स्नान करावे(च.उ.५.२०),
अपमृत्यू येऊ नये म्हणून यमतर्पण करून यमाची प्रार्थना करावी
प्रार्थना मंत्र
यमोनिहंता पितृधर्मराजो वैवस्वतो दंडधरश्च कालः ।
भूताधिपोऽदत्त कृतानुसारि कृतांत एतत् दशभिर्जपंती॥
लक्ष्मी-कुबेर पूजन प्रदोषकाळी करावे.
पूजन वेळ –
चंचल – लाभ -अमृत स .09.23 ते दु .01.44
शुभ -दु .03.11 ते 04.38
प्रदोष काळ-सायं-06.05 ते 08.35
दिवाळी पाडवा,बलिप्रतिपदा
बुधवार,दि. 26 ऑक्टोबर 2022
साडेतीन मुहूर्तातील एक दिवस,वही आणि गोवर्धन पूजनाचा
आपल्या पतीला ओवाळून पतीकडून ओवाळणी घ्यायचा दिवस ,यम द्वितीया ,भाऊबीज
वहीपूजन
लाभ -अमृत स. 6.30 ते 09.23
शुभ – स .10.50 ते दु . 12.17
चंचल-लाभ-दु.03.10 ते 06.04
पांडव पंचमी (कडपंचमी )
शनिवार,दि. 29 ऑक्टोबर 2022
धनत्रयोदशी खुलासा
22 ऑक्टोबर रोजी खालील गावामध्ये धनत्रयोदशी करावी – मुंबई -ठाणे- पुणे -नाशिक- सांगली- सातारा -कोल्हापूर सह-संपूर्ण- कोकण- गोवा गोध्रा-सोडून संपूर्ण गुजरात- कर्नाटकातील बेळगाव- शिरसी उडपी- मंगळूर या प्रदेशात २२ ऑक्टोबर रोजी शनिवारी धनत्रयोदशी करावी
खालील गावामध्ये २३ ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी करावी –
सोलापूर- नागपुरसह अकोला- अमरावती- अहमदनगर- इंदापूर उस्मानाबाद- औरंगाबाद जळगाव -जालना- धुळे नांदेड परभणी- भुसावळ यवतमाळ लातूर- वर्धा -कर्नाटकातील विजापूर -गुलबर्गा- बिदर- अथणी- हुबळी *धारवाड- बेंगलोर- मैसूर- संपूर्ण तेलंगणा आंध्र -प्रदेश मध्य प्रदेश जैसलमेर सोडून संपूर्ण राजस्थान- दिल्ली -उत्तर प्रदेश- हरियाणा पंजाब या प्रदेशात २३ ऑक्टोबर रोजी रविवारी धनत्रयोदशी करावी.
🏮🏮🏮🏮🏮🏮🏮🏮
अधिक महितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा
संदर्भ -पंचांग आधार – दाते पंचांग , सोलापूर
प्रभाकर जंगम
(ज्योतिषशास्त्री,वास्तुसल्लागार)
मो.९८६०८२५९९३
ज्योतिष,वास्तु,डाऊझिंग आणि योग सल्लागार)
ज्योतिषशास्त्री -महाराष्ट्र ज्योतिष परिषद मुंबई.
वास्तू पदविका- कवि कुलगुरू कालिदास विश्वविद्यालय रामटेक.
योग शिक्षक,प्रविण-योग गुरुकूल, नाशिक
मंगल ज्योतिष केंद्र, विनायक नगर,इस्लामपूर जि. सांगली.