Last Updated on 21 Oct 2022 6:31 AM by Sanjay Patil/Adhorekhit
बसवराज तेली सांगलीचे पोलीस अधीक्षक
समीर शेख साताराचे पोलीस अधीक्षक
शिरीष सरदेशपांडे सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक
मुंबई | राज्यातील पोलीस आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्य सरकारनं दिवाळीपूर्वीचं पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा शासन निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयानुसार ४३ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.आज पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा शासन निर्णय गृह विभागाकडून जारी करण्यात आला आहे.तर बसवराज तेली हे आता सांगलीचे नवे जिल्हा पोलीसप्रमुख असतील. शिरीष सरदेशपांडे यांची सोलापूरचे आणि सातारचे पोलीस अधिक्षक म्हणून समीर शेख यांची नियुक्ती झाली आहे.
राज्यातील राजकीय घडामोडींमुळे गेल्या काही दिवसांपासून अधिका-यांच्या बदल्या आणि रिक्त जागांवरील नियुक्त्या रखडल्या होत्या.
सांगलीचे पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांची बदली झाली आहे.त्यांच्या बदलीचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार आहेत.
नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन अशोक पाटील यांची गेनहे अन्वेषण विभाग औरंगाबादला बदली झाली आहे.
दरम्यान, राज्यातील 43 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आज करण्यात आल्या. यापैकी 24 जणांना नव्या ठिकाणी नियुक्ती देण्यात आली आहे. उर्वरित 19 अधिकाऱ्यांची त्यांच्या सध्याच्या ठिकाणावरून बदली करण्यात आली आहे. मात्र, त्यांच्या नव्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या नाहीत.
अधिकाऱ्याचे नाव,सध्याचे ठिकाण,बदलीचे ठिकाण याप्रमाणे
धनंजय आर कुलकर्णी – पदस्थापनेच्या प्रतीक्षेत – पोलीस अधीक्षक, रत्नागिरी
पवन बनसोड- अपर पोलीस अधीक्षक औरंगाबाद ग्रा- पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग
बसवराज तेली -पोलीस उप आयुक्त नागपूर शहर- पोलीस अधीक्षक,सांगली
शेख समीर अस्लम -अपर पोलीस अधीक्षक गडचिरोली- पोलीस अधीक्षक, सातारा
अंकित गोयल-पोलीस अधीक्षक, गडचिरोली- पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण
शिरीष एल सरदेशपांडे-पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक- पोलीस अधीक्षक ,सोलापूर ग्रामीण
राकेश ओला- पोलीस अधीक्षक, लाचलुतपत प्रतिबंधक विभाग, नागपूर- पोलीस अधीक्षक, अहमदनगर
एम. राजकुमार- पोलीस अधीक्षक लोहमार्ग, नागपूर- पोलीस अधीक्षक, जळगाव
रागसुधा आर.- समादेशक , राज्य राखीव पोलीस बल, गट क्रमांक ३ जालना- पोलीस अधीक्षक, परभणी
संदीप सिंह गिल- समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक १२ हिंगोली – पोलीस अधीक्षक, हिंगोली
श्रीकृ्ष्ण कोकाटे- पोलीस उप आयुक्त बृहन्मुंबई- पोलीस अधीक्षक, नांदेड
सोमय विनायक मुंडे – अपर पोलीस अधीक्षक, गडचिरोली – पोलीस अधीक्षक- लातूर
सारंग डी आवाड – पोलीस उप आयुक्त, नागपूर शहर- पोलीस अधीक्षक, बुलढाणा
गौरव सिंह (पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक ते पोलीस अधीक्षक यवतमाळ)
संदीप घुगे (समादेशक, रा.रा. पोलीस बल, गट क्र.11 नवी मुंबई ते पोलीस अधीक्षक अकोला)
रवींद्रसिंग एस. परदेशी – उप आयुक्त राज्य गुप्त वार्ता विभाग, मुंबई- पोलीस अधीक्षक, चंद्रपूर
नुरुल हसन- पोलीस उप आयुक्त, नागपूर शहर- पोलीस अधीक्षक, वर्धा
निखील पिंगळे -पोलीस अधीक्षक, लातूर- पोलीस अधीक्षक, गोंदिया
निलोत्पल- पोलीस उप आयुक्त बृहन्मुंबई- पोलीस अधीक्षक, गडचिरोली
संजय ए बारकुंड- पोलीस उप आयुक्त, नाशिक शहर- पोलीस अधीक्षक, धुळे
श्रीकांत परोपकारी- प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, नागपूर- पोलीस उप आयुक्त, ठाणे शहर
सचिन अशोक पाटील- पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण- पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, औरंगाबाद
लक्ष्मीकांत पाटील- पोलीस उप आयुक्त, ठाणे शहर- प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, नागपूर
पराग शाम मणेरे- पदस्थापनेच्या प्रतीक्षेत- उप आयुक्त विशेष सुरक्षा विभाग (व्हीआयपी सुरक्षा) मुंबई
यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार
(1) श्री. मोहित कुमार गर्ग, (2) श्री. राजेंद्र दाभाडे, (3) श्री. दीक्षितकुमार गेडाम, (4) श्री.अजय कुमार बन्सल, (5) श्री. अभिनव देशमुख, (6) श्रीम. तेजस्वी सातपुते, (7) श्री. मनोज पाटील, (8) श्री. प्रविण मुंडे, (9) श्री. जयंत मीना, (10) श्री. राकेश कलासागर, (11) श्री. पी.पी. शेवाळे, (12) श्री. अरविंद चावरिया, (13) श्री. दिलीप पाटील-भुजबळ, (14) श्री. जी. श्रीधर, (15) श्री. अरविंद साळवे, (16) श्री. प्रशांत होळकर, (17) श्री. विश्वा पानसरे (18) श्री. प्रविण पाटील, या भा.पो.से. अधिका-यांची आणि (19) श्री. निकेश खाटमोडे, रा.पो.से., यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार आहेत.











































































