शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे.पुढचे नऊ दिवस नवरात्रीची धूम असणार आहे.नवरात्रीच्या नऊ रात्री दुर्गा देवीच्या नऊ वेगवेगळ्या अवतारांना समर्पित आहेत. भगवान शिवाची पत्नी दुर्गा हिने वेगवेगळे अवतार धारण केले होते. सणाचा पहिला दिवस शैलपुत्री अवतारापासून सुरू होतो. त्यानंतर ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा,कुष्मांडा,स्कंदमाता,कात्यायनी,कालरात्री,महागौरी आणि सिद्धिदात्री या अवतारांची पूजा अनुक्रमे नऊ दिवस केली जाते.
यंदा 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबरदरम्यान नवरात्रोत्सव आहे. नवरात्रीचे नऊ दिवस भाविक देवीचे आशीर्वाद घेण्यासाठी उपवास करतात आणि नवीन कपडे खरेदी करून घालतात. विशेष म्हणजे नवरात्रीच्या प्रत्येक दिवसाला एका विशिष्ट रंगाचे महत्त्व असते.आणि लोक सहसा त्याच रंगाचे कपडे त्या दिवशी घालतात. इतकंच नाही, तर नवरात्रीची थीमही प्रत्येक दिवशीच्या रंगाप्रमाणे वेगवेगळ्या रंगांमध्ये केली जाते. सर्व सजावट आणि रोषणाई संबंधित दिवसाचा जो रंग असेल, त्याप्रमाणे केली जाते. पिवळा, मोरपंखी, राखाडी, नारंगी, पांढरा, लाल, निळा, गुलाबी आणि जांभळा हे प्रमुख नऊ रंग आहेत. हे रंग कधीच बदलत नाहीत, ते वर्षानुवर्षे सारखेच राहतात. फक्त दरवर्षी नवरात्रीला या रंगांचा क्रम बदलतो.
देवीची नऊ रूपे
- नवरात्रीच्या निमित्ताने, दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते, ज्याला एकत्रितपणे नवदुर्गा म्हणून ओळखले जाते. नवरात्रीचा प्रत्येक दिवस मा दुर्गाच्या अवताराला समर्पित आहे.
- पहिला दिवस माता शैलपुत्री, नंतर ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंद माता, कात्यायनी, काळरात्री, महागौरी आणि नवव्या दिवशी सिद्धिदात्री आहे.
- मा दुर्गाचे प्रत्येक रूप एका विशिष्ट रंगाशी संबंधित आहे आणि त्याचा एक विशेष अर्थ आहे.नवरात्रीच्या विशिष्ट दिवशी हे रंग धारण करणे शुभ मानले जाते. मा दुर्गाच्या प्रत्येक रंगाचे महत्त्व येथे आहे.
हिंदू पंचांगनुसार, 2022 च्या नवरात्रीसाठी रंगांचा क्रम खालीलप्रमाणे
नवरात्रीचे नऊ रंग
- पहिला दिवस – सोमवार 26 सप्टेंबर 2022 , रंग – पांढरा रंग
- दुसरा दिवस – मंगळवार 27 सप्टेंबर 2022 लाल रंग
- तिसरा दिवस – बुधवार 28 सप्टेंबर 2022 निळा रंग
- चौथा दिवस – 29 सप्टेंबर 2022 पिवळा रंग
- पाचवा दिवस – ३० सप्टेंबर 2022 हिरवा रंग
- सहावा दिवस – 1 ऑक्टोबर 2022 करडा रंग
- सातवा दिवस – 2 ऑक्टोबर 2022 नारिंगी रंग
- आठवा दिवस – 3 ऑक्टोबर 2022 मोरपंखी रंग
- नववा दिवस – 4 ऑक्टोबर 2022 गुलाबी रंग
नवरात्रीचे नऊ रंग ‘या’ रंगांचं महत्त्व
- पहिला दिवस : नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैल पुत्री देवीची पूजा केली जाते. शैलपुत्री देवीला पिवळा रंग आवडतो. पिवळा रंग हा ज्ञान, विद्या, सुख, शांती, अध्ययन, विद्वता, योग्यता, एकाग्रता, मानसिक आणि बौद्धिक उन्नतीचे प्रतिक आहे. हा रंग मनामध्ये नवे विचार निर्माण करतो.
- दुसरा दिवस : नवरात्री उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ब्रम्हचारिणी देवीची पूजा केली जाते. ब्रम्हचारिणी देवीला हिरवा रंग प्रिय आहे. हिरवा रंग विश्वास, उर्वरता, समृद्धी आणि प्रगतीचे प्रतिक आहे. हा रंग अनेक आजार दूर करू शकतो, असे मानले जाते.
- तिसरा दिवस : तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते. देवीच्या या रूपाला तपकिरी रंग आवडतो. तपकिरी रंग हा मेहनत आणि चिकाटीचे प्रतिक आहे. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी तपकिरी रंगाचा पोषाख परिधान करून चंद्रघंटा देवीची पूजा करावी.
- चौथा दिवस : चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते. कुष्मांडा देवीला नारंगी रंग आवडतो. नारंगी रंग हा गौरव आणि वीरतेचे प्रतिक आहे. असे मानले जातेस की, जर तुम्ही नवरात्रीच्या दिवशी नारंगी रंगाचे वस्त्र परिधान करून कुष्मांडा देवीची पुजा केली तर देवी प्रसन्न होते.
- पाचवा दिवस : पाचव्या दिवशी स्कंदमाता देवीची पूजा केली जाते. स्कंदमाता देवीला पांढरा रंग आवडतो. पांढरा रंग हा पवित्रता, शुद्धता, विद्या आणि शांतीचे प्रतिक आहे. या रंगामधून मानसिक, बौधिक आणि नैतिक स्वच्छता प्रकट होते. पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करून स्कंदमाताची पूजा करावी.
- सहावा दिवस : सहाव्या दिवशी कात्यायनी देवीची पूजा केली जाते. कात्यायनी देवीला लाल रंग आवडतो. लाल रंग हा माणसाचे शारिरीक स्वास्थ हे सुंदर आणि आनंदीत ठेवण्यास मदत करतो.
- सातवा दिवस : सातव्या दिवशी कालरत्री देवीची पूजा केली जाते. कालरात्री देवीला निळा रंग आवडतो. निळा रंग हा बळ आणि वीर भावाचे प्रतिक आहे.
- आठवा दिवस : आठव्या दिवशी महागौरी देवीची पूजा केली जाते. गुलाबी रंग हा सौभाग्य आणि प्रेमाचे प्रतिक आहे.
- नऊवा दिवस : नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच नऊव्या सिद्धीदात्री देवीची पूजा केली जाते. सिद्धीदात्री देवीला जांभळा रंग आवडतो. जांभळा रंग हा उत्साह, वैभव आणि एकमेकांमधील प्रेमाचे प्रतिक आहे. हा रंग मनाला शांती देतो.