Last Updated on 21 Sep 2022 7:07 PM by Sanjay Patil/Adhorekhit
![]()
सांगली । इस्लामपूर येथील वाळवा तालुका एज्युकेशन सोसायटीच्या विद्यामंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा.संजय रामचंद्र नागरगोजे यांना अविष्कार सोशल ॲण्ड एज्युकेशनल फाउंडेशन तर्फे सन २०२२ या वर्षीचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरुण लाड, जेष्ठ समाजवादी विचारवंत प्रा.डॉ. टी. एस. पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
प्रा संजय नागरगोजे हे गेली २५ वर्षे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत, या कालावधीत संस्थेच्या प्रेरणेने त्यांनी अनेक विद्यार्थी घडविले देश-विदेशामध्ये त्यांचे अनेक विद्यार्थी उच्च पदस्थ नोकरीमध्ये कार्यरत आहेत.एक विद्यार्थीप्रिय गुणवंत शिक्षक म्हणून त्यांचा आज सन्मान करण्यात झाला.यावेळी सितायनकार प्रा किसनराव कुराडे, क्रांतीदेवी कुराडे,डॉ रवींद्र ताटे,संजय पवार,डॉ उज्वला पाटील उपस्थित होत्या.प्रा नागरगोजे यांचे वाळवा तालुका शिक्षण संस्थेचे मानद सचिव ॲड.बी.एस.पाटील,संस्थेचे सहसचिव व शिवाजी विद्यापीठ मॅनेजमेंट कौन्सिलचे सदस्य ॲड.धैर्यशील पाटील,प्राचार्य संजय पाटील आदींनी अबिनंदन केले.
![]()









































































