Last Updated on 11 Aug 2022 7:53 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सातारा । कोयना धरणाची आज दि. 11 ऑगस्ट 2022 रोजी संध्या. 5:00 वाजता पाणी पातळी 2147 फूट 00 इंच झाली असून धरणामध्ये 85.21 टी.एम.सी. (80.97 टक्के) पाणीसाठा झाला आहे.मागील 24 तासात धरणातील पाणीसाठ्यामध्ये 4.75 टी.एम.सी. इतकी वाढ झाली आहे.
सद्यस्थितीत धरण पायथा विद्युत गृहामधून 2100 क्युसेक्स विसर्ग चालू आहे.पाणलोट क्षेत्रामधील पर्जन्यमानामध्ये वाढ झाल्यास उद्या दि. 12 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10 वाजता कोयना धरणाचे वक्रदरवाजे 1 फुट 6 इंच उघडून 8000 क्युसेक्स विसर्ग सोडणेत येणार आहे.त्यामुळे कोयना धरणातून नदीपात्रात एकूण 10 हजार 100 क्युसेक्स विसर्ग सुरू राहणार आहे.त्यामुळे कोयना नदीपात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.मागील 24 तासात धरणातील पाणीसाठ्यामध्ये 4.75 टी.एम.सी. इतकी वाढ झाली आहे.
वारणा धरणात 31.21 टी.एम.सी. पाणीसाठा
सांगली | जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 31.21 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.
विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 83.50 (105.25), धोम 10.98 (13.50), कन्हेर 8.65 (10.10), वारणा 31.21 (34.40), दूधगंगा 21.55 (25.40), राधानगरी 9.29 (8.36), तुळशी 3.22 (3.47), कासारी 2.28 (2.77), पाटगांव 3.34 (3.72), धोम बलकवडी 3.75 (4.08), उरमोडी 8.69 (9.97), तारळी 5.25 (5.85), अलमट्टी 111.64 (123).
विविध धरणातून सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे सोडलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे. कोयना – निरंक, धोम – निरंक, कण्हेर – 6404 वारणा – 9400, दुधगंगा – 4772, राधानगरी – 4456, तुळशी – निरंक, कासारी – 250 पाटगांव -250, धोम बलकवडी – 1117, उरमोडी – 3112, तारळी – 1880 व अलमट्टी धरणातून – 2 लाख क्युसेक्स विसर्ग सुरु आहे.
विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. कृष्णा पूल कराड 16.9 (45), आयर्विन पूल सांगली 26.6 (40) व अंकली पूल हरिपूर 32.2 (45.11).
जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांची वारणा धरणाला भेट देऊन पाहणी
शिराळा तालुक्यात पडणाऱ्या पावसाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी वारणा धरण येथे भेट देऊन पाहणी केली.
धरण क्षेत्रातून करण्यात येणाऱ्या विसर्गाबाबत, धरणातील पाणी पातळी, पर्जन्यमान, अतिवृष्टी कालावधीत करावयाच्या उपाययोजनांबाबत सर्व संबंधितांना दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी यावेळी दिल्या.यावेळी वाळवा उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिलारी, शिराळा तहसीलदार गणेश शिंदे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफ, वारणा उपअभियंता मिलिंद किटवाडकर, शिराळा वनक्षेत्रपाल नंदकुमार नलवडे सोबत उपस्थित होते.
Post Views: 508