Last Updated on 30 Jul 2022 9:06 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई |
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, कर सहाय्यक, लिपिक-टंकलेखक पदांच्या एकूण 228 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2022 आहे.
पदाचे नाव
उद्योग उर्जा आणि कामगार विभाग
1) उद्योग निरीक्षक गट-क, उद्योग संचालनालय – 06
गृह विभाग
2) दुय्यम निरीक्षक, गट-क, राज्य उत्पादन शुल्क – 09
वित्त विभाग
3) कर सहाय्यक, गट-क – 114
सामान्य प्रशासन विभाग
4) लिपिक-टंकलेखक (मराठी) गट-क – 89
5) लिपिक-टंकलेखक (इंग्रजी) गट-क – 10
शैक्षणिक पात्रता
1) उद्योग निरीक्षक गट-क, उद्योग संचालनालय – अभियांत्रिकी पदवी (स्थापत्य किंवा स्थापत्य समतुल्य पात्रता) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका (डिप्लोमा) किंवा विज्ञान शाखेतील पदवी.
2) दुय्यम निरीक्षक, गट-क, राज्य उत्पादन शुल्क – पदवी किंवा समतुल्य पात्रता
3) कर सहाय्यक, गट-क – पदवी किंवा समतुल्य पात्रता, मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
4) लिपिक-टंकलेखक (मराठी) गट-क – पदवी किंवा समतुल्य पात्रता, मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
5) लिपिक-टंकलेखक (इंग्रजी) गट-क – पदवी किंवा समतुल्य पात्रता, इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
शारिरीक पात्रता :- (दुय्यम निरीक्षक पद)
1) उंची – पुरुष 165 से.मी, महिला 155 से.मी.
2) छाती – पुरुष 79 सेमी व फुगवून 5 सेमी जास्त
3) वजन – महिला किमान 50 कि.ग्रॅ.
परीक्षा दिनांक :- पूर्व परीक्षा 05 नोव्हेंबर 2022

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन
अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 22 ऑगस्ट 2022 (11:59 PM)
अर्ज करण्याची सुरुवात दिनांक :- 01 ऑगस्ट 2022
महत्वाच्या लिंक









































































