Last Updated on 27 Jun 2022 5:24 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली ।
जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सांगली जिल्हा महिला राष्ट्रवादीच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘संवाद गृहिणीशी कुटुंबाच्या केंद्रबिंदूशी’ या उपक्रमांतर्गत बहे येथे महिलांनी उत्स्फुर्त प्रतिसादात या उपक्रमाचे फाॅर्म भरले.
सांगली जिल्हा महिला राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सौ. सुश्मिता जाधव या प्रमुख उपस्थितीत होत्या.जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील राजकारण व समाजकारणामध्ये काम करत असताना गृहिणी म्हणून महिलांनाही व्यक्त होण्याची संधी मिळाली अशा भावना महिलांनी व्यक्त केल्या.
नियोजन वाळवा तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षा सौ.वैशाली पाटील,सरपंच सौ.छायाताई पाटील,बहे गावचे युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत थोरात व बहे गावच्या महिला कार्यकर्त्यांनी केले.
यावेळी आशादेवी भंडारे,रुपाली भंडारे,गीता भंडारे,अर्चना कांबळे,संगीता भंडारे,माधुरी कारंडे,मनीषा सावंत,विद्या कांबळे,माया भंडारे,संगीता कारंडे,वैशाली कांबळे,संगीता डुकरे,भरती शिंदे,सुनंदा सुर्यगंध आदी महिला उपस्थित होत्या.विद्या कांबळे यांनी आभार मानले.









































































