Last Updated on 24 Apr 2022 2:19 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली ।
योग गुरुकुल अंतर्गत योग विद्याधाम,पेठ व सिद्धनाथ जीम यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या योग प्रवेश आणि परिचय वर्गाचा प्रमाणपत्र वितरण समारंभ इस्लामपूर येथील फल्ले हॉलमध्ये पार पडला.
योग परिचय वर्गाच्या सर्व विद्यार्थ्यांच्या सामुदाईक योगगीत गायनाने या कार्यक्रमाची सुरूवात झाली.मान्यवरांचे स्वागत साै.पुष्पलता खरात यांनी केले.
प्रास्ताविक प्रथमेश जंगम यांनी केले.
प्रथमेश जंगम म्हणाले,प्राणायाम,३योग संजीवन,योगप्रवेश(१ऑनलाईन ,२ऑफलाईन),परिचय (१ऑनलाईन व १ऑफलाईन) एवढे वर्ग लॅाकडाऊनपासून झाल्याचा खुलासा करून,आता योग प्रवेश आणि योग शिक्षक सद्या वर्ग सुरू आहेत.
स्वागत व सत्कार आगळीवेगळी अमूल्य अशी भेट म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे बीया अगदी आपल्या परसात त्याचं रोपण व्हावं या उद्देशाने देऊन केले.
प्रमुख अतिथी डॉ.सत्रे (देशमुख) यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण समारंभ संपन्न झाला आणि सुखी जीवनासाठी योग किती महत्त्वाचा आहे हे त्यानी त्यांच्या व्याख्यानात सांगितले.अध्यक्ष प्राचार्य डॅा. पी. बी कुलकर्णी यांनी दैनंदिन जीवनात योगाला किती महत्त्व आहे हे सांगितले.
हा योग परिचय वर्ग विनायक जगताप आणि अंकुश खोत सर यांनी घेतला.बोटकर ,स्वप्नील टिबे डॉ.नीलम चव्हाण या विद्यार्थी साधकानी आपले मनोगत व्यक्त केले.
योगशिक्षक प्रभाकर जंगम यांनी मन चैतन्याचा मला हे गीत गाऊन योगाचा आणि मनाचा किती जवळचा संबंध आहे यावर सविस्तर विवेचन केले
संस्थेचे संस्थापक आणि सध्या सुरू असणार्या योग शिक्षकवर्गाचे शिक्षक बळवंत फाळके,योगशिक्षिका डुबल,योगशिक्षक निकम,डुबल उपस्थित होते.
सूत्रसंचालन योग शिक्षक वर्गाच्या विद्यार्थीनी साै.राधिका कुलकर्णी आणि साै.स्नेहा हाके यांनी केले.
हॉलच्या सेवेबद्दल प्रवीण फल्ले यांचाही सत्कार या ठिकाणी संपन्न झाला.श्रद्दा शिंदे यांनी आभार मानले
जागतिक योग दिनाच्या निमित्ताने एकवीस जूनपूर्वी अनेक ठिकाणी योग शिबिराचे आयोजन केले जाणार आहे त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा,असे आवाहन करण्यात आले.









































































