Last Updated on 10 Apr 2022 4:50 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली ।
बहे (ता. वाळवा) येथील तीर्थक्षेत्र व पर्यटन केंद्र श्रीरामलिंग बेटावरती टाळमृदूंगाच्या गजरात ‘श्रीरामाच्या’ जयघोषात पारंपरिक पद्धतीने,मंगलमय, धार्मिक व भक्तिपूर्ण वातावरणात हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्रीराम जन्मकाळ साजरा करण्यात आला.
पहाटे अभिषेक,पूजा आरती करण्यात आली.श्रीराम जन्मकाळाचे श्रृश्राव्य कीर्तन राज्याचे विधी व न्याय सल्लागार ह.भ.प. मदन गोसावी (महाराज) यांनी केले.बहे येथील भजनी मंडळाने भजन साथ केली.

तत्पूर्वी सकाळी ह.भ.प. लखन कोकीळ (महाराज) यांचे प्रवचन झाले. दुपारी साडे बारा बाजता सूर्य डोक्यावरती आला असतासभामंडपात मध्यभागी बांधण्यात आलेल्या पाळण्यावरती श्रीरामाच्या जयघोपात उपस्थित भाविकांनी पुष्पवृष्टी केली व रामजन्मकाळ साजरा करण्यात आला.
आरतीनंतर महिलांनी श्री रामाचा पाळणा म्हटला.तुकाराम साळुंखे परिवाराने प्रतिवर्षाप्रमाणे महाप्रसादाचे आयोजन केले.संयोजन विश्वस्त बडवे यांनी केले.









































































