Last Updated on 22 Mar 2022 12:23 PM by Sanjay Patil/Adhorekhit
बहेत रंगला खेळ पैठणीचा
सांगली ।
कोरोना महामारीत कोरोना योद्धे हेच आपले तारणहार आहेत. संकट काळात गावचे रक्षण करणारे हे देवदूत आहेत. त्यांना लढण्याची हिम्म्मत, शुभेच्छा देऊन त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वाळवे तालुक्यातील बहे सर्व सोसायटीने त्यांचा यथोचित गौरव केला.त्याचबरोबर संस्थेच्यावतीने ‘खेळ पैठणीचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सोसायटीच्या मंगल कार्यालयात रंगलेल्या या खेळ पैठणीचा कार्यक्रमात सुमारे चारशेहून अधिक महिला भगिनी उपस्थित होत्या.
बहे सोसायटीच्यावतीने बहे,हुबालवाडी,खरातवाडी गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचे डॉक्टर,आशा वर्कर्स तिन्ही गावातील अंगणवाडी मदतनीस सेविका,गावात व बाहेर वैद्यकीय सेवा करणारे यांना कोरोना योद्धा म्हणून सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
सांगली जिल्हा महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुष्मिता जाधव,उपाध्यक्ष अलका माने,राजारामबापू कारखान्याचे संचालक विठ्ठल पाटील,राजारामबापू सह बँक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाबुराव हुबाले,शिवाजीराव पाटील,हणमंत पाचुंब्रे,अशोक देशमुख,भानुदास मोहिते,बाबासो मुलानी,जयदीप पाटील,मालन अरबुने,सरपंच छायाताई पाटील,संचालिका सुवर्णा पाटील,उपसरपंच अर्चना दमामे,गणेश जाधव,शिवाजी पाटील आदी उपस्थित होते.
होम मिनिस्टरच्या विजेत्यांना बक्षीस वितरण वाळवा पंचायत समिती माजी सभापती सुवर्णा जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.संस्थेचे सभापती संजय हुबाले,उपसभापती लीलावती पाटील, लखन कोकीळ,दिनकर पाटील,विजय हुबाले, सचिव सुधाकर मोहिते व गावातील महिला उपस्थित होत्या.स्वागत वैशाली पाटील यांनी केले तसेच आभार रेखा पवार यांनी मानले होम मिनिस्टर विजेत्यांची नावे अशी,वर्षा गणेश घबक,सोनाली सुहास आवळेकर,मंजुळा सुरेश डांगे,निकिता मनोज हुबाले.होम मिनिस्टरचे निवेदक राजेश माने,फैजुल पटेल यांनी केले.












































































