Last Updated on 10 Jul 2025 5:28 PM by Sanjay Patil/Adhorekhit

९४ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी फेरआरक्षण
यापूर्वी २३ एप्रिल २०२५ रोजी करण्यात आले होते आरक्षण निश्चित
इस्लामपूर येथील राजारामबापू नाट्यगृहात सोडत
उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांच्या मार्गदर्शनाखाली सोडत
सांगली । वाळवा तालुक्यातील सर्व ९४ ग्रामपंचायतींसाठी सरपंचपदासाठी आरक्षण निश्चित करण्याच्या प्रक्रियेसाठी सूचना जारी करण्यात आली असून, येत्या १५ जुलै रोजी सकाळी ११ वाजता इस्लामपूर येथील राजारामबापू नाट्यगृहात ९४ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी १५ जुलैला फेरआरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.
मुंबई ग्रामपंचायत (सरपंच/उपसरपंच) निवडणूक नियम १९६४ मधील सुधारित नियम २ अ मधील पोट नियम ५ अन्वये वाळवा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीमधून (९४ ग्रामपंचायती मधुन) अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती मधुन सरपंच पदाचे आरक्षण त्या जाती/जमातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात उतरत्या क्रमाने राखुन ठेवली जाणार असल्याची माहिती तहसीलदार सचिन पाटील यांनी दिली.
पोट नियम ६ अन्वये नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओ. बी. सी.) व सर्वसाधारण प्रवर्ग तसेच (प्रत्येक प्रवर्गातील ५० टक्के स्त्री आरक्षणासह) सरपंच पदासाठी आरक्षण काढण्यासाठी मंगळवारी, १५ जुलै २०२५ रोजी राजाराम बापू नाट्यगृह इस्लामपूर येथे सकाळी ११ वाजल्यापासून कामकाज संपेपर्यंत सोडत काढण्यात येणार आहे. तरी वाळवा तालुक्यातील९४ ग्रामपंचायत क्षेत्रातील मतदार यांना सदरचे कामकाज पाहायचे असेल त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन तहसीलदार सचिन पाटील यांनी केले आहे.
तसेच सदरचे सरपंच आरक्षणाचा कालावधी दिनांक १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०३० असा राहणार आहे.
गावनिहाय आरक्षण असे : (महिला ५० टक्के आरक्षण)
अनुसूचित जाती – ११ (६)
अनुसूचित जमाती – १ (०)
नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) – २६ (१३)
खुल्या जागेसाठी – ५६ (२८)
म्हणून फेरआरक्षण…
दरम्यान, यापूर्वी २३ एप्रिल २०२५ रोजी आरक्षण निश्चित करण्यात आले होते. ते आरक्षण आता रद्द करण्यात आले आहे. राज्यातील काही ग्रामपंचायतींमध्ये नियमानुसार आरक्षण निश्चित झाले नसल्यामुळे सर्व ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांचे फेरआरक्षण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
हेही वाचा : शेतकऱ्यांनी तात्काळ ॲग्रिस्टॅक ओळख क्रमांक तयार करावा – तहसीलदार सचिन पाटील
![]()
दरम्यान, यापूर्वी २३ एप्रिल २०२५ रोजी आरक्षण निश्चित करण्यात आले होते. ते आरक्षण आता रद्द करण्यात आले आहे. त्यावेळची निघालेली आरक्षण सोडत वाचकांच्या माहितीसाठी…
अनुसूचित जाती :
काळमवाडी, गोंडवाडी, मर्दवाडी, लवंडमाची, वाघवाडी
अनुसूचित जाती- महिला :
कारंदवाडी, पडवळवाडी, विठ्ठलवाडी, ढगेवाडी, साटपेवाडी, जुनेखेड
अनुसूचित जमाती :
कापूसखेड
नागरिकांचा मागास प्रवर्ग :
भडकंबे, लाडेगांव, बागणी, नागांव, कणेगांव, कोरेगांव, मालेवाडी, शेणे, बेरडमाची, काकाचीवाडी, केदारवाडी, फाळकेवाडी, घबकवाडी
नागरिकांचा मागास प्रवर्ग – महिला :
पोखर्णी, रेठरेधरण, शिरटे, ओझर्डे, कामेरी, मिरजवाडी, नेर्ले, ठाणापुडे, चिकुर्डे, शिरगांव, इटकरे, फार्णेवाडी (शि.), जक्राईवाडी
सर्वसाधारण :
ताकारी, नरसिंहपूर, बिचूद, कासेगांव, साखराळे, तांदुळवाडी, बावची, येडेनिपाणी, वाटेगांव, किल्लेमच्छींद्रगड, रेठरेहरणाक्ष, शिगांव, नवेखेड, गोटखिंडी, हुबालवाडी, बनेवाडी, भाटवाडी, कुंडलवाडी, येडेमच्छिंद्र, भवानीनगर, खरातवाडी, मसूचीवाडी, गाताडवाडी, डोंगरवाडी, येवलेवाडी, शिवपूरी, शेखरवाडी, भरतवाडी
सर्वसाधारण – महिला :
कोळे, कार्वे, देवर्डे, कुरळप, ऐतवडे बु., बहे, सुरूल, तुजारपूर, ऐतवडे खु., वशी, पेठ, करंजवडे, दुधारी, बोरगांव, येलूर, रोझावाडी, तांबवे, ढवळी, बहादुरवाडी, वाळवा, माणिकवाडी, फार्णेवाडी बो., अहिरवाडी, महादेवाडी, मरळनाथपूर, धोत्रेवाडी, नायकलवाडी, जांभुळवाडी.
![]()









































































