Last Updated on 24 Oct 2024 8:26 PM by Sanjay Patil/Adhorekhit
बारामतीत ‘काका-पुतणे’ आमने-सामने येणार
मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत विधानसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. जयंत पाटील यांनी पहिल्या यादीत शरद पवार गटाच्या एकूण 45 उमेदवारांची नावे जाहीर केली. यामध्ये बारामती मतदारसंघाचा देखील समावेश आहे. बारामतीमधून युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिल्यामुळे आता बारामतीत काका विरुद्ध पुतण्या असा संघर्ष पुन्हा एकदा दिसणार आहे.
इस्लामपूर येथून जयंत पाटील,काटोल-अनिल देशमुख, घनसावंगी -राजेश टोपे, कराड उत्तर-बाळासाहेब पाटील,मुंब्रा कळवा-जितेंद्र आव्हाड,कोरेगाव-शशिकांत शिंदे,वसमत-जयप्रकाश दांडेगावकर,जळगाव ग्रामीण-गुलाबराव देवकर,इंदापूर-हर्षवर्धन पाटील,राहुरी-प्राजक्त तनपुरे शिरूर-अशोकराव पवार,शिराळा-मानसिंगराव नाईक,विक्रमगड-सुनील भुसारा, कर्जत जामखेड-रोहित पवार, बारामती-युगेंद्र पवार, कागल-समरजित घाटगे, अहमदपूर-विनायकराव पाटील,सिंदखेडराजा- राजेंद्र शिंगणे, उदगीर सुधाकर भालेराव, भोकरदन -चंद्रकांत दानवे, तुमसर-चरण वाघमारे, किनवट-प्रदीप नाईक,यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
जिंतूर-विजय भांबळे, केज -पृथ्वीराज साठे, बेलापूर-संदीप नाईक, वडगाव शेरी – बापूसाहेब पठारे, जामनेर- दिलीप खोडपे, मुर्तिजापूर सम्राट डोंगरदिवे,अहेरी-भाग्यश्री अत्राम, बदनापूर- बबलू चौधरी, मुरबाड- सुभाष पवार, घाटकोपर पूर्व – राखी जाधव, आंबेगाव- देवदत्त निकम, कोपरगाव- संदीप वर्पे, शेवगाव-पाथर्डी -प्रताप ढाकणे, पारनेर- राणी लंके, आष्टी- मेहबूब शेख, करमाळा-नारायण पाटील, सोलापूर शहर उत्तर- महेश कोठे, चिपळूण- प्रशांत यादव, तासगाव-कवठेमहाकाळ रोहित आर आर पाटील यांना संधी देण्यात आली आहे. तसेच दुसरी यादी कदाचित उद्या अंतिम होणार असून ती उद्या किंवा परवा घोषित होईल, अशी माहितीही जयंत पाटील यांनी दिली.
उमेदवारांच्या पहिल्या यादीत चार महिला उमेदवारांना संधी दिली आहे. यामध्ये पारनेर मतदारसंघातून खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांनी उमेदवारी दिली आहे. तर मुक्ताईनगगर मतदारसंघातून मादी मंत्री आणि आमदार एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे यांनी उमेदवारी दिली आहे. तसेच अहेरी मतदारसंघातून भाग्यश्री अत्राम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर घाटकोपर पूर्व मतदारसंघातून राखी जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
- इस्लामपूर – जयंत पाटील
- काटोल – अनिल देशमुख
- कराड उत्तर – बाळासाहेब पाटील
- घणसावंगी -राजेश टोपे
- मुंब्रा कळवा- जितेंद्र आव्हाड
- कोरेगाव-शशिकांत शिंदे
- वसमत – जयप्रकाश दांडेगावकर
- जळगाव ग्रामीण – गुलाबराव देवकर
- इंदापूर – हर्षवर्धन पाटील
- राहुरी – प्राजक्ता तनपुरे
- शिरूर – अशोक पवार
- शिराळा – मानसिंग नाईक
- विक्रमगड- सुनील भूसारा
- कर्जत जामखेड- रोहित पवार
- अहमदपूर- विनायक पाटील
- सिंदखेड राजा – राजेंद्र शिंगणे
- उदगीर – सुधाकर भालेराव
- भोकरदन – चंद्रकांत दानवे
- तुमसर : चंद्रकांत वाघमारे
- किनवट- प्रदीप नाईक
- जिंतूर – विजय भांबळे
- केज – पृथ्वीराज साठे
- बेलापूर- संदीप नाईक
- वडगाव शेरी- बापूसाहेब पाठारे
- जामनेर- दिलीप घोडपे
- मुक्ताईनगर – रोहिणी खडसे
- मुर्तीजापूर- सम्राट डोंगरदिवे
- नागपूर पूर्व – दिनेश्वर पेठे
- तिरोडा – रविकांत बोपचे
- अहेरी – भाग्यश्री आत्राम
- बदनापूर – रुपकुमार उर्फ बबलू चौधरी
- मुरबाड – सुभाष पवार
- घाटकोपर पूर्व – राखी जाधव
- आंबेगाव – देवदत्त निकम
- बारामती – युगेंद्र पवार
- कोपरगाव -संदीप वरपे
- शेवगाव – प्रताप ढाकणे
- पारनेर – राणी लंके
- आष्टी – मेहबूब शेख
- करमाळा – नारायण पाटील
- सोलापूर शहर उत्तर – महेश कोठे
- चिपळूण – प्रशांत यादव
- कागल – समरजीतसिंह घाटगे
- तासगाव कवठेमहांकाळ – रोहित पाटील
- हडपसर- प्रशांत जगताप












































































