Last Updated on 10 Dec 2023 6:16 PM by Sanjay Patil/Adhorekhit
निशिकांत भोसले- पाटील यांचे जयंत पाटील यांना आव्हान
सांगली । 35 वर्षे आमदार आहात त्यातील सतरा वर्षे मंत्री होता तरी तालुक्यातील तुम्हाला मूलभूत प्रश्न सोडविता आले नाहीत.गावात रस्ते,पाणी देऊ शकला नाही.फक्त पै-पाहुण्यांना राजकारणात संधी देत आलात,सर्व सत्ताकेंद्र स्वत: व पै-पाहुण्याच्या ताब्यात देऊन एक प्रकारची हुकुमशाही चालविली,कधी सामान्य माणूस आमचा तुम्हाला दिसला नाही.संस्थांच्या माध्यमातुन जनतेला दिलासा देण्याऐवजी दहशतीखाली ठेवत आहात,या पुढे तालुक्यात विरोधकांचा दबाव व दहशत चालू देणार नाही असा इशारा भारतीय जनता पार्टी चे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील(दादा) यांनी दिली.
भडकंबे (ता.वाळवा) येथे राज्याचे कामगार मंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुरेश खाडे (भाऊ)यांच्या विशेष प्रयत्नातून अनु सूचित जाती व नवबौध्द घटकांचा विकास अंतर्गत दलीत वस्ती सुधार योजनेतून एस टी स्टँड ते कोरेगाव या रस्त्याच्या डांबरीकरण कामासाठी रक्कम रुपये 32 लाख इतका निधी मंजूर झाला,या निधीतुन डांबरीकरण कामाचा शुभारंभ भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले- पाटील(दादा) यांचे हस्ते झाले.यावेळी ते बोलत होते.
यावेळी बोलताना निशिकांत भोसले -पाटील (दादा) म्हणाले,केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा विकास निधी इस्लामपुर विधानसभा मतदार संघात आला आहे.शेतकरी ऊसदरासाठी संघर्ष करतोय,पण काही लोकांना आपणच शेतकऱ्यांचे कैवारी असल्याचे वाटते,खरंच तुम्ही शेतकऱ्यांचे कैवारी आहात तर साखर कारखाने सुरू होऊन दोन महिने होत आले तरी आपण दर जाहीर करीत नाही.शेतकरी बांधवांना आंदोलन करावी लागतात.काही लोकांना स्वतः सहकार महर्षी असल्याचे वाटते.कारखान्यातील मयत सभासदांच्या वारसांना सभासद करून घेत नाहीत. साखर कारखाना खाजगीकरणाकडे वाटचाल सुरू आहे.गरिबांतील गरीब लोकांच्यात राहून मला काम करायचे आहे. या पुढे तालुक्यातील प्रत्येक घटकाला भयमुक्त करायचे आहे,केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व सामान्य लोकांसाठी अनेक योजना आणल्या.या सरकारची रयतेचे सरकार म्हणून एक ओळख होऊ लागली आहे.
वाळवा तालुका भाजपा अध्यक्ष निवास पाटील म्हणाले,वाळवा तालुक्यातील गोर गरीब यांच्या साठी निशिकांत दादा यांचे दार नेहमी उघडे असते,येथे पै पाहुणे बघून प्रवेश दिला जात नाही.निशिकांत दादा फक्त जिल्हाध्यक्ष असताना कोट्यवधी रुपयांचा निधी त्यांनी आणला.
भाजपाचे जिल्हा सचिव धैर्यशील मोरे म्हणाले,प्रकाश हॉस्पिटल च्या माध्यमातून निशिकांतदादा यांच्या मुळे सर्व रुग्णांवर मोफत उपचार होतात. एम आर आय, सोनो ग्राफी,सी टी स्कॅन , एक्सरे सर्व मोफत सुविधा दिली आहे.या तालुक्यातील जनता माझी आहे. त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे माझे कर्तव्य आहे ही भावना त्या मागची आहे.या तालुक्यातील जनतेने त्यांच्या मागे राहण्याची गरज आहे.यावेळी भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष प्रवीण माने यांनी मनोगत व्यक्त केले
यावेळी वाळवा तालुका भाजपा अध्यक्ष निवास पाटील,जिल्हा भाजपा सचिव धैर्यशील मोरे,वाळवा तालुका युवा मोर्चा अध्यक्ष प्रवीण माने, जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील,तालुका संघटन सरचिटणीस संदीप सावंत,वाळवा तालुका भाजपा कोषाध्यक्ष रणजित माने,वाळवा तालुका भाजपा उपाध्यक्ष गजानन पाटील,शरद पाटील, डॉ.राजेंद्र पाटील,माजी उपसरपंच डॉ.संभाजी तळप,अशोक पाटील,जेष्ठनेते.वसंतराव पाटील,ग्रामपंचायत सदस्य नितीन बागणे,शुभम माळी,पंडित लोंढे,लताताई पाटील,उषाताई बनसोडे,मानद संचालक आनंदा पाटील,अमोल बागणे,महादेव बागणे,सागर पाटील,भानुदास पाटील,गणेश मोरे,शिवाजी पाटील,सूरज जगताप,दीपक पाटील,सुभाष बनसोडे,विक्रम वारे,बाळासो लोंढे,परशुराम बामणे,भगवान बनसोडे,नामदेव बनसोडे,विकास पाटील आदीसह अन्य मान्यवर भाजपाचे पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.









































































